पारा (राहुल शेळके ): वाशी पोलीस स्टेशन येथे नुकताच पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांचा तसेच पारा औट पोस्ट चे जमादार मोहसीन खान पठाण ज्यांनी कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी केली त्त्यांचा शनिवारी दुपारी डोंगरेवाडी येथे ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच अशोक भराटे, चेअरमन पोपट कुरुंद, दत्तू ठुले, माऊली मुळे, वच्चीस्ट कुरुंद, मच्छिन्द्र मुळे, शिदू कुरुंद, शिवाजी भराटे, दिलीप भराटे, आदेश कुरुंद, बालाजी भराटे आदी गावकरी हजर होते.