सोनारी (अशोक माने)
सोनारी कौडगाव रस्त्यालगत शेतातून घरी येत असताना सोनारी येथील केतन साळुंके व दत्ता साळुंके यांना वाघ सदृश प्राणी हरणाची शिकार करुन तुरीच्या शेतातून ऊसाच्या शेतात जाताना निदर्शनास आले. हि घटना दि. १७ रोजी सायंकाळी ५ ते ५:३० च्या दरम्यान घडली. अचानक समोरुन जानार्या भला मोठा वाघ सदृश प्राणी दिसल्याने दोघेही घाबरुन शेतातून पळ काढत जवळीलच जगताप वस्तीवर येऊन तेथील नागरीकांना सदीरल घटनाक्रम सांगीतला. यावेळी संबंधीत वन विभाग अधिकारी यांना फोन द्वारे कल्पना दिल्यावर वन मजूर यांनी रात्री ७:३० च्या दरम्यान येऊन पाहणी केली असता तरस किंवा चिता असण्याची शक्यता असल्याचे सांगितले. सकाळी वन विभाग अधिकारी येऊन पाहणी करतील तोपर्यंत नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना दिल्या आहेत.
Home ताज्या बातम्या सावधान!सोनारी परिसरात वाघ आलाय? सोनारी परिसरात वाघ सदृश प्राणी दिसल्याने परिसरात भीतीचे...