१४ नव्हे १३, महायुतीच्या मेळाव्याला एक घटकपक्ष अनुपस्थित

1
161

धाराशिव – शहरात आज महायुतीचा मेळावा पार पडला मात्र मेळाव्याला भाजपचा जुना घटकपक्ष अनुपस्थित होता.
एकूण १४ घटकपक्ष असलेल्या महायुतीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, प्रहार, आर पी आय यांच्यासह इतर घटकपक्ष आहेत त्यात राष्ट्रीय समाज पक्षाचा देखील समावेश आहे. रासपला महायुतीच्या मेळाव्याचे निमंत्रण देण्यात आले होते मात्र वरिष्ठांनी सहभागी न होण्यास सांगितले असल्याची माहिती काही पदाधिकाऱ्यांनी दिली.
रासपचे प्रमुख महादेव जानकर जिल्ह्याचे सहपालकमंत्री होते तसेच २०१७ साली रासपने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या २१ जागा लढवल्या होत्या. पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या मतदार संघात रासपचा प्रभाव आहे. राज्यस्तरावर बारामती, माढा, परभणी मतदारसंघात देखील रासपचा प्रभाव आहे. येत्या काळात रासप महायुती पासून दूर राहिल्यास भाजपच्या ५१ टक्के मतदान घेण्याच्या रणनीतीला धक्का पोहचू शकतो असे राजकीय विश्लेषक सांगतात.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here