धाराशिव – पंतप्रधानांच्या लाडक्या उद्योगपतीला फायदा करून देण्यासाठी सोयाबीनचे भाव पडले असा आरोप माजी खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी धाराशिव येथे केला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चाला संबोधित करताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी हा आरोप केला आहे ते म्हणाले की,गौतम अदानिणी मोठ्या प्रमाणात परदेशातून पामतेल आयात केलेलं आहे.त्याचा धंदा चांगला व्हायला पाहिजे यासाठी पामतेलावर आयात कर पाच टक्क्यांनी कमी केला त्याचा परिणाम सोयाबीन च्या दरावर झाला. जेव्हा पामतेल स्वस्तामध्ये मिळतं त्यावेळी आपोआप सोयाबीनच्या, भुईमुगाच्या, सूर्यफुलाच्या सगळ्या प्रकारच्या तेलावर त्याचा परिणाम होतो.ज्यावेळी पक्क्या मालाचा भाव कमी होतो त्यावेळी कच्या मालाचा भाव कमी होतो हे साधं अर्थशास्त्र आहे.सोयाबीन चे भाव पडले असतील आणि आत्महत्या अडीच टक्क्यांनी वाढल्या असतील तर अदानिंचे हात देखील रक्ताने बरबटले असतील असेही ते यावेळी म्हणाले.दरम्यान त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली, सरकार शेतकऱ्यांच कर्जमाफ करत नाही उद्योगपतींचे कर्ज माफ केले जातात. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे त्यांचा सातबारा कोरा करा, नैसर्गिक आपत्तीला शेतकरी जबाबदार नाही निसर्गाचे नुकसान उद्योगपतींनी केलं म्हणून शिक्षा आम्हाला झाली कधी गारपिटीच्या माध्यमातून तर कधी महापुराच्या माध्यमांतून, दुष्काळाच्या माध्यमातून शिक्षा झाली.
कांद्याला भाव मिळत नाही कारण निर्यातीवर बंदी घातली,त्यामुळे ३० लाख लोकांचा रोजगार बुडाला. गेल्या जन्मीचे पाप म्हणून आम्ही गरीब राहिलो नाहीतर सरकारने लुटणारी धोरणे राबवली म्हणून आम्ही गरीब राहिलो त्याचा जाब सरकारला विचारायचा आहे असं त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोंधित करताना सांगितले
आणखी वाचा