धाराशिव जिल्ह्यात 15 जानेवारी 13 फेब्रुवारी या कालावधीत जमावबंदी व शस्त्रबंदी असणार आहे. निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी याबाबत आदेश काढले आहेत.
धाराशिव जिल्ह्यात दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी मकर संक्रांत हे सण साजरा होणार आहे. दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी छत्रपती संभाजीराजे राज्याभिषेक दिन साजरा होणार आहे. दिनांक 18 जानेवारी2024 ते दिनांक 26 जानेवारी2024 या कालावधीत श्री तुळजाभवानी शाकंभरी नवरात्र उत्सव साजरा होणार आहे. दिनांक 24 जानेवारी2024 ते दिनांक 26 जानेवारी 2024 या कालावधीत श्री खंडोबा यात्रा मैलापूर नळदुर्ग ता. तुळजापूर येथे संपन्न होणार आहे. दिनांक 20 जानेवारी 2024 ते दिनांक 24 जानेवारी 2024 या कालावधीत परंडा शहर ता. परंडा येथे हजरत ख्वॉजा बद्रीद्दीन चिस्ती दर्गा उरुस संपन्न होणार आहे. दिनांक 24 जानेवारी 2024 ते दिनांक 02 फेब्रुवारी 2024 या कालावधीत धाराशिव शहर ता, धाराशिव येथे हजरत ख्वॉजा शम्सोद्दीन गाजी दर्गा उरुस संपन्न होणार आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण मिळावे या मागणीसाठी विविध पक्ष संघटना यांचे कडून आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पिकविमा व नुकसान भरपाईची देय रक्कम मिळावी आणि इतर मागण्या अनुषंगाने शेतकरी तसेच विविध पक्ष / संघटना यांचे कडून धरणे, मोर्चे, उपोषण, आत्मदहन, बंद, निदर्शने, तालाठोको व रास्तारोको इत्यादी प्रकारचे आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हयात पर्यन्यमान कमी झाल्याने विविध पक्ष / संघटना व शेतकरी संघटना यांचे कडून धाराशिव जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा या मागणीकरीता आंदोलने होत आहेत. धाराशिव जिल्हयात ग्रामीण / शहरी भागात विविध ठिकाणी यात्रा / जत्रा / ऊरुस लहान मोठया स्वरुपात साजरे करण्यात येतात. व्यक्ती, व्यक्ती समुह तसेच विविध पक्ष/संघटना यांचे वतीने त्यांच्या विविध मागण्यासाठी अचानकपणे अंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी संपन्न होणारे धार्मिक सण उत्सव, कार्यकम च यात्रा/जत्रा ऊरुस तसेच आंदोलनात्मक कार्यक्रम धाराशिव जिल्ह्यात शांततेत पार पाडण्याकरिता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दिनांक 15 जानेवारी 2024 रोजीचे 00:01 पासून ते दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी 24:00 वाजे पावेतो (दोन्ही दिवस धरून) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) प्रमाणे जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश संपुर्ण धाराशिव जिल्ह्यात जारी होणार आहेत.
या कालावधीत शस्त्र, सोटे, काठी, तलवार, बंदूक जवळ बाळगणार नाहीत.
2) लाठया, काठया, शारिरीक इजा होण्यास कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील, अशा वस्तु बाळगणार नाहीत.
3) कोणतेही दाहक पदार्थ, किंवा स्फोटके जवळ बाळगणार नाहीत.
4) दगड किंवा इतर क्षेत्रपणास्त्रे किंवा फोडक्याची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधे गोळे करुन ठेवणार नाहीत किंवा बाळगणार नाहीत किंवा तयार करणार नाहीत.
5) आवेशी भाषणे, अंगविक्षेपण, विडंबनात्मक नकला करणार नाही सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रे, निशाणी, घोषणा फलक किंवा इतर कोणत्याही वस्तु जवळ बाळगणार नाहीत.
6) जाहिरपणे घोषणा करणे, गाणी म्हणने, वाद्य वाजविणे किंवा कोणतीही कृती जे देशाच्या संविधानातील मुल्यांच्या विरुध्द असेल किंवा देशाचा मान व सार्वभौमत्व यांना इजा पोहचवणारी असेल किंवा सार्वजनिक सुरक्षा आणि सामाजिक सलोखा यांना हानी पोहचवणारी असेल आणि जाहिरपणे प्रक्षोभक भाषण व असभ्य वर्तन करणार नाहीत.
7) व्यक्तींच्या किंवा शवांच्या किंवा प्रेते किंवा आकृती किंवा त्याच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणार नाहीत.
8) पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगी शिवाय एकत्र येता येणार नाही किंवा मिरवणुक / मोर्चा काढता येणार
उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश हे खालील बाबींकरीता लागू होणार नाहीत
1) अंत्ययात्रा
2) धार्मिक विधी, लग्न सोहळा, सामाजिक सण, शासकीय कार्यक्रम इत्यादी
3) शासकीय सेवेत तैनात कर्मचारी
4) सार्वजनिक करमणुकीची सिनेमागृह, रंगमंच इत्यादी
प्रतिबंधात्मक आदेशाचे काळात कोणताही मोर्चा, मिरवणूका तसेच सभा निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करावयाचे झाल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे व अशी परवानगी घेतल्यानंतरच उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाही
आणखी वाचा
पंतप्रधानांच्या लाडक्या उद्योगपतीला फायदा करून देण्यासाठी सोयाबीनचे भाव पाडले