धाराशिव –
तक्रार मिटवून घेण्यासाठी व पुन्हा तक्रार देऊन त्रास देवु नको असे सांगण्यासाठी लाचमागणी करून स्वीकारल्याने तिघांविरोधत कारवाई करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी की,
तक्रारदार यांचेविरुद्ध वाशी पोलीस ठाणे येथे अदखलपात्र गुन्हा दाखल आहे. त्यामध्ये यातील आरोपी क्रमांक तानाजी त्रिंबक तांबे यांनी यातील तक्रारदार यांना तुमच्या विरुद्ध 107 प्रमाणे प्लेन चॅप्टर / किरकोळ कारवाई करण्यासाठी बिट अंमलदार यांना सांगितले होते. त्यामुळे त्यांनी किरकोळ कारवाईचा रिपोर्ट पाठविला आहे. त्या बदल्यात व तक्रारदार यांचे पत्नीस समजावून सांगून सदरची तक्रार मिटवून घेण्यासाठी व पुन्हा तक्रार देऊन त्रास देवु नको असे सांगण्यासाठी लाचमागणी करण्यात आली होती. पडताळणी दरम्यान आरोपी तानाजी त्रिंबक तांबे यांनी आरोपी रणजित अनिल कासारे यांचेकरवी पंचा समक्ष २०००/-रुपये लाचेची मागणी केली.
सापळा कारवाई दरम्यान आरोपी तानाजी त्रिंबक तांबे याने लाचेची रक्कम खाजगी इसम आरोपी पवन राजेंद्र हिंगमिरे यांच्याकडे देण्यास सांगितले असता आरोपी पवन राजेंद्र हिंगमिरे यांनी सदर २०००/- रुपये लाच रक्कम पंचांसमक्ष स्विकारल्याने सदर ०२ आरोपी लोकसेवक व ०१ खाजगी इसम यांना ताब्यात घेतले असुन पोलीस स्टेशन वाशी, ज़िल्हा धाराशिव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे. सापळा अधिकारी म्हणून नानासाहेब कदम, पोलीस निरीक्षक काम पाहिले तर
सापळा पथकात – पोलीस अमलदार सिद्धेश्वर तावसकर , अविनाश आचार्य यांचा समावेश आहे.
आरोपींमध्ये यांचा समावेश
-तानाजी त्रिंबक तांबे , वय 28 वर्षे, पोलीस शिपाई ब. नं. 260, नेमणूक पोलीस ठाणे वाशी, ज़ि. धाराशिव ( वर्ग -3-)
- रणजित अनिल कासारे, वय 31 वर्षे, पोलीस शिपाई ब. नं. 514, नेमणूक पोलीस ठाणे वाशी, ज़ि. धाराशिव ( वर्ग -3-)
- पवन राजेंद्र हिंगमिरे, वय 26 वर्षे, रा. झिन्नर, ता. वाशी, ज़ि. धाराशिव ( खाजगी ईसम )