तानाजीराव सावंत यांनी गत विधानसभा निवडणुकीत
मतदाराना दिलेल्या खोटया आश्वासनाची राहूल मोटे यांनी पत्रकार परीषदेत पुराव्यासह केली पोलखोल
परंडा (भजनदास गुडे ) तानाजीराव सावंत यांनी गत विधानसभा निवडनुकी वेळी मतदार संघांतील मतदारांना दिलेली अश्वासने पाळली नाहीत त्यांनी मतदार संघातील जनतेची फसवणूक केली आसल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेरवार राहुल मोटे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे.
गुरूवार दि १४ नोव्हेंबर रोजी परंडा येथील सरगम मंगल कार्यालयात संध्याकाळी महाविकास आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली.
यावेळी तानाजीराव सावंत यांनी दिलेल्या विविध अश्वासणाची ऑडियो क्लीप दाखवीत खोटया आश्वासनाची पोलखोल केली.
पुढे बोलताना राहुल मोटे म्हणाले की पाच वर्षात उजणीचे पाणी का आणले नाही तसेच , परंडा व वाशी येथे एम.आय.डी.सी कुठे आहे. त्यांनी दाखऊन द्यावी असे आवाहन केले.तसेच बचत गटाने उत्पादन केलेल्या मालाला बाजारपेठ मिळऊन देतो असे अश्वासन सावंत यांनी दिले होते.कोणतेही अश्वासन पाळले नाही त्या मुळे महिलांनी सावंत यांना मतदान का करावे असा प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या कार्यकाळात मतदार संघात शासकीय नाविन कार्यालयाची इमारत,पाझर तलाव,बांधारा, मध्यम,लघू तलाव,नवीन रुग्लाय उभारून चालू केले असल्याचे त्यांनी दाखऊन ह्यावे असे अवाहान मोटे यांनी केले आहे.
तसेच पुढे बोलताना मोटे म्हणाले की मला मतदार संघातील मतदारांचा वाढता
पाठीबा पाहून त्यांच्या पाया खालची घसरली असल्याने ते माझ्यावर बिनबुडाचे आरोप करीत आहेत असे मोटे म्हणाले
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख रणजित पाटील,
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयकुमार जैन, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अॅड. संदीप पाटील,कॉग्रेस आयचे तालुकाध्यक्ष हनुमंत वाघमोडे, आमोल काळे,अॅड.नुरोद्दीन चौधरी,रमेश परदेशी,अॅड सुभाष वेताळ,राहूल बनसोडे,किरण करळे,मधुकर पाटील,विक्रम पाटील,सत्तार पठाण,पाशाभाई शाहाबर्फीवाले,हरिचंद्र मिस्कीन, अॅड.गोविद कोटूळे,डॉ.रविद्र जगताप, हनुमंत कोलते, धनंजय मोरे,पंकज पाटील, सचिण पाटील,मलीक शेख,बुद्धीवान लटके,सुरेश कोकाटे,किरण शिदे,सुधीर वाघमोडे,गणेश चव्हाण, खय्युम तुटके याच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.