Home धाराशिव तरूणाई ला प्रोत्साहित करण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या वेशभूषेत रस्त्यावर उतरला तरुण; परंडा...

तरूणाई ला प्रोत्साहित करण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या वेशभूषेत रस्त्यावर उतरला तरुण; परंडा मतदारसंघात पाच वाजेपर्यंत ५७.०७ टक्के मतदान

0
28

भूम ( वसीम काजळेकर )
लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी शासन जसे प्रयत्न करते तसेच प्रयत्न काही नागरिक करत असतात. परंडा मतदारसंघात तरुणाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वेशभूषेत येऊन मतदान करण्याचे आवाहन केले. परांडा विधानसभा मतदार संघातील २१ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. परांडा विधानसभा मतदार संघात हाती आलेल्या आकडेवारी नुसार सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान ५७.०७ टक्के मतदान झाले. परांडा विधानसभा मतदार संघात प्रचाराच्या अंतिम टप्प्यात प्रचार शिगेला पोहचला होता. विद्यमान विधानसभा सदस्य प्रा डॉ तानाजी सावंत,माजी आमदार राहुल मोटे,वंचितचे प्रवीण रणबागुल,रासप चे डॉ राहुल घुले अशी चौरंगी लढत या मतदार संघात रंगली होती. या मतदार संघात ३ लाख ३० हजार ७७३ मतदार आहेत. त्यामध्ये १ लाख ७५ हजार ३२१ पुरुष तर १ लाख ५५ हजार ५४६ स्त्री मतदार आहेत. या मतदार संघात ६ तृतीय पंथी मतदार आहेत. भूम,परांडा,वाशी या तिन्ही तालुक्यात ३७६ मतदान कक्षाची सुविधा करण्यात आली होती. भूम तालुक्यात १३५ मतदान केंद्रावर ६५ हजार ३९९ पुरुष तर ५६ हजार ३४२ एकूण १ लाख १९ हजार ६४१ मतदार होते. परांडा तालुक्यात १४२ मतदान केंद्रात ६५ हजार ७५१ पुरुष व ५८ हजार ९२ महिला असे एकूण १ लाख २३ हजार ८४७ मतदार होते. वाशी तालुक्यात ९९ मतदार केंद्रात ४६ हजार १७१ पुरुष तर ४१ हजार ११२ असे एकूण ८७ हजार २८५ मतदार होते. उपविभागीय पोलीस अधिकारी गौरीप्रसाद हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. परांडा मतदार संघात मतदानाच्या दिवशी कोठेही कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही .

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here