महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल मोटे यांना विजयी करण्याचा संकल्प
तात्या अखेर पर्यत शिवसेना पक्षाशी निष्ठेने राहीले मी ही पक्षनिष्ठा सोडणार नाही रणजित पाटील यांची घोषणा
महाविकास अघाडीचे उमेदवार राहूल मोटे यांना विजयी करण्याचे रणजित पाटील यांचे शिवसैनिकांना आवाहन
परंडा (भजनदास गुडे)तात्या शेवट पर्यंत शिवसेना पक्षाशी एक निष्ठेने राहील मी पण त्याच प्रमाणे शिवसेना पक्षाशी निष्ठेने राहाणार अल्याचे अश्वासन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धाराशिव शिवसेना जिल्हाप्रमुख रणजित पाटील यांनी परंडा येथिल महाविकास आघाडीच्या बैठकीत बोलताना दिले.
शनिवार दि ९ नोव्हेंबर रोजी परंडा येथिल महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार पक्ष,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांची परंडा शहरातील राजवीरा लॉन्स येथे संयुक्त बैठक घेण्यात आली.
महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडू शिवसेना जिल्हा प्रमुख रणजित पाटील यांना परंडा विधानसभेची उमेदवारी देण्यात आली होती तर महा विकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी आमदार राहूल मोटे यांना पक्षाच्या वतीने उमेदवारी देण्यात आली होती.पाटील व मोटे यांनी पक्षाचे एबी फॉर्म जोडून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्या मध्ये संमभ्रमाचे वातावरण तयार झाले होते.
महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनमध्ये चर्चा होऊन परंडा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला सोडण्यात आला.उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आखेरच्या दिवशी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रणजित पाटील यांना उमेदवारी परत घेण्याच्या सुचना दिल्या असता उद्धव ठाकरे यांचा आदेश व पक्षनिष्ठा काय असते ते दाखऊन उमेदवारी अर्ज परत घेतला.रणजित पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे निष्ठांवंत शिवसैनिका मध्ये नाराजी पसरली होती.शिव सैनिकांची नाराजी दुर करण्या साठी महाविकास आघाडीच्या पदाधिकारी,कार्यकर्त्याची संयुक्त बैठक ठेवण्यात आली होती.
या बैठकीस उपस्थित शिवसेना पदाधिकारी,कार्यकर्ते यांना रणजित पाटील यांनी मार्गदर्शन करताना महा विकास आघाडीचे उमेदवार राहूल मोटे यांना विजयी करण्याचे अवाहाण केले या मुळे शिवसैनाकांची नाराजी दूर झाल्याचे दिसुन आले.
यावेळी रणजित पाटील म्हणाले की तात्या आजारी असताना तानाजी सावंत यांच्या सांगण्या वरून तात्याच्या विरोधात बॅक संचालक पदाची तक्रार करण्यात आली अश्या लोकांना धडा शिकवायची वेळ आली असुन महाविकास अघाडी चे उमेदवार राहुल मोटे यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी शिवसेना महीला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कोहिर सय्यद,माजी जि.प.सदस्य सिद्धेश्वर पाटील,ॲड.संदिप पाटील, अणिल शेंडगे,दिलीप शाळू,रुपेश शेंडगे,जयकुमार जैन,तात्या गायकवाड,चेतन बोराडे,रईस मुजावर,शंकर जाधव,शंकर इतापे,हरिश्चंद्र मिस्कीन,अॅड. सुजित देवकते,नसिर शहाबर्फीवाले,अॅड.सुभाष वेताळ,रेवण ढोरे,सुरेश डाकवाले,दादा पाडुळे,अरविद
नरुटे,नंदू शिदे,संतोष गायकवाड प्रशांत गायकवाड, दत्ता मेहर, दत्ता गुडे,आप्पा नरुटे,डिगंबर गुडे,तानाजी गुडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी सामाजीक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहूल बनसोडे यांनी केले.