मच्छीमार संस्थेचे काम शासनाच्या निमाने चालू
अंदोलामागे गुंडाचा हात, चेअरमन बालाजी सल्ले यांचा खळबळजनक आरोप
परंडा (भजनदास गुडे):-उस्मानाबाद येथील मच्छी अंदोलना मागे गुंडाचा हात असुन सिना कोळेगाव धरणावर वरील तुळजाभवाणी मत्स व्यावसायीक संस्थेने तलाव सोडावा असा कुटील डाव रचला आहे असा आरोप संस्थेचे चेअरमन बालाजी सल्ले यांनी केला आहे. शासनाच्या नियमा प्रमाणे सिना काळेगाव धरणाचा ठेका तुळजाभवानी मत्स व्यावसाईक संस्थेला मिळाला असुन नियमाचे पालन करून संस्था कामकाज. करीत आहे मात्र गेल्या ४ महिन्या पासुन करमाळा तालूक्यातील काही गुंड वृत्तीचे लोक सिना कोळेगाव धरणात त्यांच्या लोकांना मोफत मच्छीमारी करू द्यावी या साठी त्रास देऊन धमकी देत आहे त्यांच्या विरोधात करमाळा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असुन याची चौकशी करुन गुंडा विरुध्द कारवाई करावी अशी मागणी चेअरमन सल्ले यांनी केली आहे .सिनाकोळेगाव धरणा वरील तुळजाभवानी मच्छीमारी संस्थेमार्फत परंडा तालुक्यातील आलेश्वर,डोंजा,रोसा डोमगाव, भोत्रा,कौडगाव व करमाळा तालूक्यातील अवाटी,लिमगाव, दिलमेश्वर,करंजा,बोरगाव, खांबेवाडी,सह ईतर गावातील मच्छीमारी व्यावसाईक यांना संस्थेने पास दिला असुन त्यांचा व्यावसाय सुरू आहे . सिना कोळेगाव धरणावरील ठेकेदार संस्थेकडून आम्हाला कसलाही त्रास नसल्याचे आलेश्वर दिलमेश्वर येथील मच्छी व्यावसाईक यांनी सांगितले.मात्र गरीब मच्छीमारी व्यावसाय करणाऱ्यावर काही गुंडा कडून जानिव पुर्वक त्रास देण्यात येत असून जाळे तोडण्यात येत आहे उस्मानाबाद येथील अंदोलनात खोटे आरोप असल्याचे सांगीतले आहे . या वेळी आलेश्वरचे माजी सरपंच राहुल चव्हाण,उपसरपंच मोतीराम नगरे,सुनील संजय भोई महावीर भोई,दिलमेश्वर तालुका करमाळा येथील हनुमंत मल्लाव, दगडू भोई महावीर भोई चुडामन नगरे दत्ता सले तात्या नगरे सागर नगरे कांतीलाल नगरे,कैलास नगरे बाळू नगरे रोहिनी भोई लक्ष्मी भोई सुमन सुमन भोई,,माधुरी भुई,दादा भुई,भारत भुई,येडबा भुई,रामा भुई,राम ठोसर,अजय भुई,दत्ता भुई,विजय भुई,रामदास भुई,बाबू भोई,विलास भोई,कैलास भुई, अतिक मुलाणी,लखन ठोसर, निलेश भोई,हिरामन भोई,वैशाली भोई,भाग्यश्री भोई,तुळसाबाई भोई,आर्चना भोई,माधुरी भोई,सोनाबाई भुई,सोना भोई,लक्ष्मी भोई,शिंधू भोई मानिषा भोई,कांतीलाल भोई,भाऊसिंग भोई,यांच्यासह भोत्रा,मुगंशी,येथील मच्छमार भुई समाजाच्या महीला व पुरुष उपस्थीत होते.