उस्मानाबाद – कर्नाटक राज्यातील रायचूर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मल्लिकार्जुन गौडा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याप्रकरणी त्यांना पदावरून तात्काळ करण्यात यावे या मागणीचे निवेदन डॉ.बी.आर.आंबेडकर लाॅयर्स फोरम संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतींना निवेदन दिले. या निवेदनात असे म्हटले आहे की कर्नाटक राज्यातील रायचूर जिल्हा व सत्र न्यायालयात दिनांक २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यावेळी महात्मा गांधी व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या जिल्हा व सत्र न्यायाधीश मलिकार्जुन गौडा हे ध्वजारोहणासाठी आले असता त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा पाहताच प्रतिमा काढून टाका अन्यथा मी ध्वजारोहण करणार नाही असे उद्गार काढले आणि लगेच बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा काढून टाकली डॉ आंबेडकरांचा व राष्ट्रध्वजाचा अवमान केला त्यामुळे न्यायाधीश मल्लिकार्जुन गौडा यांना संविधानिक पदावर राहण्याचा अधिकार नाही त्यामुळे न्यायाधीश मल्लिकार्जुन गौडा यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर फोरम उस्मानाबाद च्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत असून मल्लिकार्जुन गौडा यांना पदावरून तात्काळ बडतर्फ करण्यात यावे व त्यांच्यावर योग्य ते कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन दिले या निवेदनावर कॅड इंद्रजित शिंदे, ॲड. भास्कर गायकवाड,कॅड गणपती कांबळे,कॅड मायादेवी सरवदे,ॲड. पी.ए.माने,ॲड. ए.एस.चंदनशिवे,ॲड. अर्चना गवई,ॲड. आकांक्षा माने,ॲड. नंदकुमार जकाते,ॲड. ए व्ही धेंडे,ॲड. परवेज सुबदानी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
त्याला पदावर राहण्याचा हक्क नाही त्याला पाहिले पदमुक्त करावे अन्यथा त्या पदावरून लोकांचा विश्वास उडून अराजकता मजेल