तेर – उस्मानाबाद जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या वतीने पोषण महिना साजरा केला जात आहे. किमान या महिन्यात तरी लाभार्थ्यांना सकस आहाराचा पुरवठा होईल अशी अपेक्षा होती मात्र ही अपेक्षा फोल ठरली असून तेर येथील अंगणवाडीत दिल्या जाणाऱ्या खाऊत आल्या आढळून आल्याने निकृष्ट आहार पुरवठ्याचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे.
याबाबतीत अधिक माहिती अशी की, उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे एकात्मिक बालविकास प्रकल्पातंर्गत चालविणयात येणाऱ्या तेर मधील अंगणवाडी मधये निकृष्ट दर्जाचे खाऊ पुरविण्यात येत असून या प्रकारामुळे पालकामध्ये संताप व्यक्त केला जात आहे.गुरुवार दि.१६ जागरूक पालक हनुमंत कानाडे यांच्या बाळाला अंगणवाडी क्रमांक २०७ मधून दिलेल्या पुड्यात चक्क अळ्या आढळून आल्या.तेर येथील एका बचत गटाकडून हा खाऊ पुरविला जात आहे. तो निकृष्ट असल्याने यापूर्वी ही बहुतांश पालकांनी अंगणवाडी च्या सेविकांना खाऊ घेऊन जाण्यास नकार दिला आहे.दरम्यान तेर प्रकल्पाचे प्रकल्प आधिकारी जे.जी.राठोड,विस्तार अधिकारी पी.बी.वळसे पर्यवेक्षिका मनीषा पाटील यांनी या प्रकारणांचा पंचनामा केला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य मंगेश पांगरकर, अविनाश इंगळे वैभव वैरागकर, सुरज इंगळे, आमन कोळपे, महेश गाढवे, हनुमंत कानडे, राजेंद्र कानडे यांच्या पंचनाम्यावर सह्या आहेत.दरम्यान अंगणवाडी मधील बालकांना पुर्वी प्रमाणेच पोषण आहार चे वाटप करण्यात यावे अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य मंगेश पांगरकर यांनी केली.
आमच्या कङे तर दोन तीन महीन्यात एकदा च मिळेलते