उस्मानाबाद जिल्ह्यात ३ प्रकल्पांना सॅनीटायझर उत्पादनाचे परवाने

1
127

उस्मानाबाद – कोरोना च्या पार्श्वभूमीवर हॅण्ड सॅनीटायझर ला मोठी मागणी वाढली आहे. काही ठिकाणी भेसळ असलेले, अवैध सॅनीटायझर अन्न व औषध प्रशासनाने जप्त केले होते. चांगल्या प्रतीचे सॅनीटायझर मिळण्याची शाश्वती नागरिकांना नव्हती मात्र केंद्र आणि राज्य सरकारने अत्यंत तातडीने पावले उचलत सॅनीटायझर उत्पादन करू इच्छिणाऱ्या प्रकल्पांना परवानगी दिली आहे. ज्या नागरिकांना हात धुण्याची सोय नाही त्यांना सॅनीटायझर हा एक चांगला पर्याय आहे.
 उस्मानाबाद जिल्ह्यात तीन नव्या प्रकल्पांना अन्न व औषध प्रशासनाने उत्पादन करण्यासाठी परवानगी दिली आहे. लोकमंगल माऊली ली. लोहारा, नॅचरल शुगर  रांजणी ता. कळंब,  अॅडलर्स बायोएनर्जी गुरगाव ता. कळंब यांना सॅनीटायझर निर्मितीचे परवाने मिळाले आहेत.
हे परवाने देताना अन्न व औषध प्रशासनाने काही अटी आणि शर्ती ठेऊन सॅनीटायझर च्या उत्पादनास परवानगी दिलेली आहे. या उत्पादकांना ३० जून पर्यंत उत्पादन करण्याची परवानगी आहे. तसेच उत्पादन केलेल्या सॅनीटायझर ची कलबह्याता ( शेल्फ लाईफ) १२ महिन्यापेक्षा अधिक नसू नये. यासह पाच विविध प्रकारच्या अटी अन्न व औषध प्रशासनाने उत्पादकांना परवानगी देताना लावल्या आहेत.

1 COMMENT

  1. खूप छान प्रकल्प आहे त्यामुळे त्याची किंमत कमी होण्यास मदत होईल आणि सहजपणे उपलब्ध होतील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here