back to top
Thursday, October 3, 2024
Google search engine
Homeताज्या बातम्याअतिवृष्टीतील पीक नुकसानीची माहिती शेतकऱ्यांनी 72 तासांत विमा कंपनीस कळवावी जिल्हाधिकारी दिवेगावकर...

अतिवृष्टीतील पीक नुकसानीची माहिती शेतकऱ्यांनी 72 तासांत विमा कंपनीस कळवावी जिल्हाधिकारी दिवेगावकर यांचे आवाहन

 

उस्मानाबाद,दि.08:-जिल्हयातील मंगरुळ,परंडा,आसु,जवळा,अनाळा, सोनारी,अंभी,माणकेश्वर,भुम,ईट,पारगाव, तेरखेडा,उमरगा,नारंगवाडी,मुळज या महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीने  आणि ढगफुटी होऊन पुराचे पाणी शेतात शिरुन,शेत दीर्घकाळ जलमय होऊन नुकसान झाले असल्याने शेतकरी नुकसानीबाबत  सांगत आहेत. तसेच यापुढेही पाऊस पडण्याची शक्यता आहे. पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत याबाबतची सूचना विमा कंपनी आणि ‍कृषी विभागास देणे बंधनकारक आहे.शेतकऱ्यांनी नुकसान कळविताना सर्वे नं‍बरनिहाय नुकसानग्रस्त क्षेत्राचा तपशील कळविणे  आवश्यक आहे,असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.

 प्राप्त झालेल्या सुचनेनंतर संयुक्त समितीमार्फत शेतकऱ्याच्या नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी करण्यात येईल. पीक विमा भरलेल्या ज्या पिकांचे नुकसान झाले आहे अशा पिकांच्या नुकसानीच्या सूचना शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअर वरुन Crop Insurance  किंवा विमा कंपनीचे Farmmitra  हे ॲप डाऊनलोड करुन त्या ॲपव्दारे आपल्या नुकसानीची माहिती द्यावी किंवा 18002095959 या  टोल फ्री क्रमांकावर कळवावी तसेच संबंधित गावचे कृषी सहाय्यक आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालयास ऑफ लाईन पध्द्तीनेही अर्ज करुन शेतकरी माहिती कळवू शकतील.

                            

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments