Home ताज्या बातम्या कोरोना मनाई आदेशांचे पालन करुन सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करा – राज तिलक...

कोरोना मनाई आदेशांचे पालन करुन सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करा – राज तिलक रौशन

0
108

 

कोरोना मनाई आदेशांचे पालन करुन सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन यांनी उमरगा येथील कार्यक्रमात केले.कोरोना साथीच्या पार्श्वभुमीवर दि. 10 ते 19 सप्टेंबर 2021 या काळात गणेशोत्सव साजरा होत असून महाराष्ट्र शासनाच्या दि. 29.06.2021 रोजी व दि. 08.09.2021 रोजीच्या परिपत्रकान्वये सार्वजनिक गणेश उत्सवासंबंधी मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या आहेत. या सुचनांचे तसेच कोरोना संबंधी मनाई आदेशांचे पालन व्हावे, जनजागृती व्हावी या उद्देशाने उमरगा पोलीस ठाण्यामार्फत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची व शांतता समितीची बैठक आज दि. 08 सप्टेंबर रोजी उमरगा येथे आयोजीत करण्यात आली होती.यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here