उस्मानाबाद – देशात आणि राज्यात कोरोना चा धोका वाढलेला आहे. स्वच्छतेचे महत्व गेल्या काही दिवसात वाढलेले आहे. कोविड -१९ मुळे लोकांच्या दैनंदिन गरजांमध्ये बदल घडवून आणले आहेत जसे की मास्क , हॅन्ड सानिटीझर वापरून आपले हात स्वच्छ करणे . बाहेरून घरी आलं की प्रत्येक गोष्टीच निर्जंतुकीकरण करणे हे पहल काम. अशा काळात प्रत्येक गोष्ट धुणे किंवा निर्जंतुकीकरण करणे प्रत्येकाला शक्य होत नाही त्याने कोविड -१९ चा धोका वाढू शकतो ही गोष्ट टाळण्यासाठी उस्मानाबादच्या अभिषेक पतंगे नामक मराठी होतकरू तरुणाने एक्स लॅब्स यु व्ही सि डिसइन्फेकशन युनिट नावाचा एक बॉक्स बनवला आहे . यु व्ही सि लाईट बॅक्टरीया व व्हायरसेस च्या डी एन ए वर परिणाम करते आणि त्याला ९९.९९% पर्यंत मारून टाकते याची तपासणी प्रयोग शाळेत ही केली गेली आहे . अवघ्या ५ ते १० मिनिटामध्ये कुठल्याही वस्तूच निर्जंतुकीकरण होतं असा त्यांनी दावा केला आहे . यामध्ये दैनंदिनीच्या वस्तू जस कि चाव्या ,पाकीट,मास्क तसेच मोबाईल , लॅपटॉप , पिशवीत असलेली फळे , भाज्या ,दुधाच्या पिशव्या , खेळण्या , कुरियर्स, मेकअप चे सामान अशा सर्व वस्तूंचे निर्जंतुकीकरण होते . या प्रॉडक्ट चा उत्पादन पुण्यामध्ये होत आहे .याचा वापर दवाखाने ,हॉटेल्स ,दुकाने ,औषधाची दुकाने ,शाळा व ऑफिसेस, सलून अशा विविध ठिकाणी करू शकतो . बी. ई. इले्ट्रॉनिक्स शिकलेल्या अभिषेक ने उत्पादन बनवून या काळात काही तरुणांना रोजगार दिला आहे. हा बॉक्स इतर निर्जंतुकीकरण करणाऱ्या बॉक्स पेक्षा स्वस्त असल्याचा दावा पतंगे यांनी केला आहे.
उस्मानाबादच्या तरुणाने बनवला यु व्ही डीसइनफेक्टन्ट बॉक्स
RELATED ARTICLES
अभिनंदन अभिषेक!!
Very good. Plz add dimensions of product and price
मस्त initiative अभिषेक ,
The box size is 25liters. For price and further enquiries kindly visit our website or call/whatsapp on 7422001122. Thank you.