तेर(प्रतिनीधी) तालुक्यातील तेर येथे कोरोना बाधीताच्या संपर्कात आलेल्या संभाव्य व्यक्तीस पोलिसानी ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आले आहे. या बाबत माहिती अशी की दिल्ली येथे तब्लिकी-ए-जमात या धार्मिक कार्यक्रम झाला होता कार्यक्रमाच्या ३ की.मी. परिसरातील मोबाईल नंबर पोलिसांनी शोधले होते. त्यात उस्मानाबाद जिल्ह्यातील एकूण आठ नागरिकांचा तपास जिल्हा प्रशासनाने सुरू केला होता.
दिल्ली येथे निजामुद्दीन परिसरात झालेल्या धार्मिक कार्यक्रमानंतर अनेक नागरिक कोरोणा बाधित झाल्याचे उघडकीस आले आहे. बाधीतांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक नागरिकाचा शोध घेतला जात आहे.अशा एका व्यक्तीबधितामध्ये तेरच्या एकाचा समावेश असल्याची माहिती प्रशासनाकडे होती.
सदर व्यक्ती जो मोबाईल क्रमांक वापरतो तो त्याच्या आईच्या नावावर आहे. तो व्यक्ती दिल्ली वरून मुंबई आणि मुंबई वरून तेर येथे येत असल्याची माहिती प्रशासनाने तेर येथील यंत्रणेला दिली होती त्यानुसार सरपंच, पोलिस विभाग,तलाठी,पोलिस पाटील हे पाळत ठेऊन होते.1 एप्रिलला संशयीत व त्याची पत्नी दूपारी आल्याचे पोलीसाना कळताच त्यानी त्यास ताब्यात घेऊन ग्रामीण रूग्नालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तसेच घाश्याच्या स्त्रावाचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवले आहेत. खबरदारी म्हणून पोलिसानी ग्रामीण रुग्णालय परीसर बंदीस्त केला आहे. यातील विशेष बाब म्हणजे ती व्यक्ती तब्लिकी-ए-जमात शी संबंधित नाही.
Suspected jari asala tari prashasanane ji kalji ghyayala havi hoti ti bilkul Nahi ghetali, Gavacha jya parisarat to sapadala to area adhi sanitize Karan ani seal Karan ani varya hot. Parantu ashi konti hi dakhal ghetali Nahi hi sharmechi bab ahe. Yancha halgarji Pana mule Ter madhil lakho jiv dhokyat yeu shaktat..
भयंकर उलथापालथ चालू आहे, सर्वांनी योग्य ती काळजी घेणं सरकारला सहकार्य करणं भाग आहे. गावामध्ये धोका नाही असा समजही घातक ठरेल