मच्छीमारांचे आंदोलन मोडीत! पोलिसांनी केला लाठीचार्ज?
उस्मानाबाद – कालपासून सुरू असलेले मच्छीमारांचे आंदोलन मागण्या मान्य होण्यापूर्वीच मोडीत निघाले आहे. रक्तदान करण्यापूर्वी शिवभोजन थाळी जेवण्यासाठी गेलेल्या आंदोलकांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.( आंदोलक कालपासून उपाशी होते, काहींनी आणलेली शिदोरी देखील संपल्याने प्रशासकीय इमारतीत असलेल्या शिवभोजन केंद्रावर ते गेले) त्यात महिला आणि बालकांचा देखील समावेश असून किती जणांना ताब्यात घेतले याची माहिती थोड्या वेळाने सांगण्यात येईल, लाठीमार केलेली माहिती चुकीची असल्याची प्रतिक्रीया आनंद नगरचे पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांनी दिली.कालपासून सुरू असलेले मच्छीमारांचे आंदोलन प्रशासनाची डोकेदुखी ठरले होते. पोलिसांसमोर देखील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असल्याने त्यांनी आंदोलन थांबण्यासाठी कालपासून प्रयत्न केले होते मात्र त्यास यश आले नाही.
आज सकाळी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली मात्र ती चर्चा निष्फळ ठरली. काहीवेळाने रक्तदान करून सरकारला ते रक्तदान देण्याचे आंदोलनकर्त्यांनी ठरवले होते त्यानुसार सोलापूर येथील मेडीकेयर ब्लड बँक रक्त घेण्यासाठी आंदोलन स्थळी आली होती. रक्तदान करण्यापूर्वी जेवण करणे आवश्यक असल्याने काही जण सेंट्रल बिल्डिंग येथे जेवण करण्यासाठी गेले होते काही रक्तदानाच्या ठिकाणी तर काहीजण छतावर होते त्यांना एकेक करून पोलिसांनी ताब्यात घेतले असून. आंदोलकावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया आनंद नगर पोलीस स्टेशन मध्ये सुरू आहे.
आंदोलन संपल्यानंतर मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले असून परिसरात कडक पोलीस बंदोबस्त आहे.