परंडा तालुका राष्ट्रवादी महिला कॉग्रेस आक्रमक;
टाकळी व परंडा येथील मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी आरोपीना कठोर शिक्षा करण्याची मागणी
यशस्वीनी अभीयानाच्या राज्य समन्वक वैशालीताई मोटे यांच्या नेत्रत्वाखाली पो.नि.गिड्डे यांना देण्यात आले निवेदन
परंडा (प्रतिनिधी ) तालूक्यातील टाकळी येथे ११ वर्षीय उल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील आरोपी व परंडा येथील लैगीक छळ प्रकरणातील आरोपीना कोठार शिक्षा होन्याच्या द्रष्टीने कारवाई करावी अशी मागणी यशस्वीनी सामाजीक अभियानच्या राज्य समन्वयक वैशाली मोटे यांनी राष्टावादी महीला कॉग्रेसच्या सिष्ठ मंडळासह पोलीस निरीक्षक सुनिल गिड्डे यांची भेट घेऊन कार्यवाही करण्या संदर्भातील निवेदन देण्यात आले.
पीडित मुलगी व तीच्या कुटूंबांची श्रीमती वैशालीताई मोटे यांनी भेट घेऊन धीर दिला व न्याय मिळऊन देन्याचे अश्वासन दिले .
दि २ ऑक्टोबर रोजी पोलिस निरिक्षक सुनिल गिड्डे यांची वैशालीताई मोटे यांनी यशस्वीनी अभियान,राष्ट्रवादी महिली आघाडी,राष्ट्रवादी महिला यूवती आघाडीच्या महीला कार्यकर्त्यां सह भेट घेऊन गुन्हा संदर्भात केलेल्या कारवाईची माहिती घेतली दोन्ही प्रकरणातील आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करून अटक करन्यात आली असुन तपास गतीने सुरू असल्याचे पोलिस निरिक्षक सुनिल गिड्डे यानी माहिती दिली .
या वेळी राष्ट्रवादी कॉग्रेस महिला अघाडी,राष्ट्रवादी युवती विभागाच्या वतीने पोलिस निरिक्षक सुनिल गिड्डे यांना मागणीचे निवेदन देन्यात आले.
परंडा तालूक्यातील टाकळी येथे दि.३० सप्टेबर रोजी एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर जिवे मारन्याची धमकी देऊन अरोपी प्रकाश बारसकर याने अत्याचार केल्याची घडना घडली आहे.
तर परंडा येथे एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला धमकी देत आरोपी सचीन हाके फेब्रुवारी महिन्या पासुन लैंगिक छ्ळ करीत असल्याची घटना दि २९ सप्टेबर रोजी उघडकीस आली होती.
या दोन्ही प्रकरणातील आरोपी विरूध्द बाल लैंगीक अत्याचार विरोधी कायदया सह विविध कलम नुसार दि ३० सप्टेबर रोजी परंडा पोलिसात गुन्हा दाखल करून अटक करन्यात आली आहे.या दोन्ही घटनेतील आरोपी विरूद्ध कठोर कारवाई करावी अशी मागणी राष्टतवादी महीला कॉग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे . निवेदनावर राष्ट्रवादी महिला कॉग्रेसच्या तालुका अध्यक्षा स्वाती गायकवाड,यशस्वीनी अभियानच्या परंडा तालूका समन्वयक राखीताई देशमुख,शहर अध्यक्ष संजना माने ,राष्ट्रवादी युवती कॉग्रेस च्या तालुका अध्यक्षा प्रियंका काळे,नगरसेविका रत्नमाला बनसोडे,अर्चना माने,कमल सोनमुखे,संगीता खंकाळ,शौला चौतमहाल,कावेरा काळे,लक्ष्मी बनसोडे,आशा शिंदे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
या वेळी राहुल बनसोडे,अमोल जगताप,मनोज काळे,शरद झोंबाडे,बाबुराव काळे,शफील पटेल,हनुमंत यादव,बापु मिस्कीन, अजय बनसोडे,नंदू शिंदे,श्रीहरी नाईकवाडी,सचिन पाटील,मयूर जाधव,यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते .