काटेगाव (नितीन गाढवे)
प्राथमिक आरोग्य केंद्र आगळगाव अंतर्गत येणाऱ्या धामणगावात १०० टक्के लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती डॉ प्रसाद कदम यांनी दिली.
बार्शी तालुक्यातील धामणगाव हे गाव सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्याच्या बॉर्डरवर वसले या गावची लोखसंख्या ५१५ असून यामध्ये १८ वर्षावरील ३६५ नागरिकांचे लसीकरण पूर्ण करून प्राथमिक आरोग्य केंद्रात धामणगाव हे गाव १०० टक्के लसीकरण करणारे पाहिले गाव ठरले.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ प्रसाद कदम, डॉ समीर उकरंडे, आरोग्य सहाय्यक नानासाहेब जगनाडे, सरपंच संध्या ढोणे, उपसरपंच शंकर अवधूत, ग्रामसेविका दिपाली मोरे, पोलिस पाटील हरिदास, गोरे सर,LHV सिरीन मणियार,आरोग्य सेविका रुक्मिणी धनी, तसलीम शेख,आशा वर्कर मिना काटे, अंगणवाडी सेविका ढोणे उपस्थित होते.