लोणी (महेश शिंदे)परांडा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथामिक शाळा लोणी येथील चि.यश सतिश केमदारणे,श्रेया बालाजी केमदारणे व जि.प प्रा शाळा कसबे तडवळे येथून लोणी गावाचा सुपुत्र साईश हनुमंत शिंदे यांची नवोदय विदयालय तुळजापूर येथे निवड झाली .या यशस्वी विदयार्थीचे जि.प.प्रा.शाळा लोणी यांच्या वतीने शालिय समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील व मुख्यध्यापक शिला पाटील व उपअध्यक्ष विकास शिंदे व सर्व शिक्षकवर्ग यांनी अभिनंदन करून कौतुक केले .
शाळेमध्ये यशस्वी विदयार्थी यश सतिश केमदारणे याचा सत्कार मुख्यध्यापक पाटील मॅडम यांनी केला,श्रेया बालाजी केमदारणे यांच्या सत्कार अध्यक्ष लक्ष्मण पाटील तर जि.प .प्रा .शाळा कसबे तडवळे येथील विदयार्थी लोणी गावचा सुपुत्र साईश हनुमंत शिंदे यांचा सत्कार उपअध्यक्ष विकास शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला
तसेच पालक आई वडील व वर्गशिक्षक यांचा ही या वेळी सत्कार करण्यात आला .या वेळी शिक्षक स्टप, ग्रामस्थ, पालक व शिक्षण प्रेमी मोठया प्रमाणात उपस्थित होते यशस्वी विदयार्थीचे लोणी परिसरातुन व पालक वर्गातुन अभिनंदन व कौतुक होत आहे.