back to top
Wednesday, September 11, 2024
Google search engine
Homeताज्या बातम्याउस्मानाबाद येथील स्वतंत्र विद्यापीठ सुरु करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आग्रही...

उस्मानाबाद येथील स्वतंत्र विद्यापीठ सुरु करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आग्रही मागणी

 


उस्मानाबाद येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठाचे उपकेंद्र उस्मानाबाद येथे कार्यरत आहेत. सदर उपकेंद्रास स्वतंत्र विद्यापीठ म्हणुन कार्यान्वयीत करणे बाबतचा अहवाल शासनाने मागीतला आहे. या प्रस्तुत विषयास अनुसरुन डॉ.प्रकाश बच्छाव सह संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य यांनी उपकेंद्रास भेट दिली व सर्वांचे मत एकुन घेतले व विद्यापीठ उपकेंद्राची पाहणी केली. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने  सह संचालक यांना निवेदन दिले.

उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठ व्हावे, ही जिल्हावासीयांची अनेक दिवसाची मागणी आहे. विद्यापीठ उपकेंद्र मंजूर करून घेतल्यानंतर भविष्यात स्वतंत्र विद्यापीठात रूपांतर करण्यासाठी एमआयडीसी ची ६० एकर जागा खास बाब म्हणून उपकेंद्रासाठी तत्कालीन राज्यमंत्री आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी उपलब्ध करून घेतली होती. राणा दादा यांच्या मार्गदर्शनाने सर्व पक्षीय भेद बाजुला ठेऊन ऐकोपाने आपल्या जिल्हयात विद्यापीठ झाले पाहीजे ही भावना या प्रसंगी व्यक्त केली. उस्मानाबादचा समावेश आकांक्षित जिल्ह्यात असून येथील युवकांना विविध अभ्यासक्रमाचे शिक्षण येथेच राहून करता यावे यासाठी स्वतंत्र विद्यापीठाची नितांत गरज आहे. उस्मानाबाद जिल्हयातील अनेक विद्यार्थी हे शेतकरी कुटुंबातील आहेत, विद्यार्थ्यांना प्रवास खर्च व औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडी विद्यापीठ येथे शिक्षण घेण्याचा शैक्षणिक खर्च पेलवत नसल्यामुळे बाहेर जात नाहीत, यामुळे उस्मानाबाद जिल्हयातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यास मर्यादा पडत आहे, याचा आपण गांर्भीर्याने विचार करावा.

दि. १९ ऑगस्ट २०२० रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीचा संदर्भ देत उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठ सुरू करण्याच्या अनुषंगाने माजी कुलगुरू श्री.आर.एन.माळी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केल्याचे वर्तमान पत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते.

परंतु यानंतर दि १९ सेप्टेंबर २०२० रोजीच्या औरंगाबाद येथील पत्रकार परिषदे मध्ये विद्यापीठाचे विभाजन नाही, उस्मानाबाद उपकेंद्र विकासासाठी स्थापन केलेली समिती विभाजनासाठी नाही, विद्यापीठाचे दोन भाग करण्याचा कुठलाही प्रयत्न महाविकास आघाडी सरकारकडून होणार नाही, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मोठ्या कष्टाने निर्माण झाले असून उस्मानाबादला स्वतंत्र विद्यापीठ करण्याचा प्रश्नच नाही असे सांगितले होते.

यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थी व नागरिकांमध्ये मोठा संभ्रम असून  शासनाने आपली भूमिका तात्काळ स्पष्ट करून जिल्हावासीयांची गरज व मागणी लक्षात घेवून उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठ मंजूर करण्याच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही सुरु करण्याच्या सूचना द्याव्यात.

उस्मानाबाद विद्यापीठ होण्याच्या धोरणातुन सोईस्कर रित्या सत्ताधाऱ्यांच्या राजकीय वेगवेगळया भुमिकेमुळे जिल्ह्यातील विद्यार्थी व नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण होत आहे. या विषयावर परस्पर विरोधी वक्तव्ये चीड निर्माण करणारी असून आपण शासनाची अधिकृत भूमिका तात्काळ स्पष्ट करून उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठ मंजूर करावे, अशी आग्रही मागणी उस्मानाबाद जिल्ह्यातील विद्यार्थी व नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.

उस्मानाबाद जिल्हयातील उपकेंद्राचे रुपांतर विद्यापीठामध्ये झाले तर जिल्हयातील शैक्षणिक गुणवत्तेला खरे अर्थाने प्रोत्साहन, चालना मिळेल व अनेकांना रोजगाराची संधी मिळवुन आर्थीक स्थर उंचावेल अशी आशा आहे. व आपण याचा सकारात्मक विचार करावा अशी विनंती करण्यात आली.

या प्रसंगी सिनेट सदस्य संजय निंबाळकर, ॲड.मिलींद पाटील, प्रा.देशमुख सर, प्रा.संभाजी भोसले,  भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, भाजप शहराध्यक्ष राहुल काकडे, आत्मनिर्भर जिल्हा संयोजक सचिन लोंढे, युवा मोर्चा शहराध्यक्ष सुजित साळुंके, विद्यार्थी जिल्हा संयोजक विशाल पाटील, जिल्हा सहसंयोजक सलमान शेख, जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील नाईकवाडी, सचिव गणेश एडके, धनराज नवले, सागर दंडनाईक सह सर्व पक्षीय नेते, विद्यार्थी प्रतिनीधी व युवामोर्चाचे कार्यकर्ते उपस्थीत होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments