back to top
Wednesday, September 11, 2024
Google search engine
Homeताज्या बातम्याउस्मानाबाद शहरासाठी उजनी धरणातून वाढीव पाणी आरक्षण मंजुर

उस्मानाबाद शहरासाठी उजनी धरणातून वाढीव पाणी आरक्षण मंजुर

  उजनी उस्मानाबाद समांतर पाणी योजनेचा मार्ग मोकळा 



उस्मानाबाद – 

उस्मानाबाद शहराला 2013 पासुन उजनी धरनातुन पिण्यासाठी पाणी आणले जाते. उजनी योजने अंतर्गत आनलेले पाणी शहराला पुरेशा प्रमाणात पुरत नव्हते शहराला या पुर्वी तेरणा व रुईभर धरनातुन पिण्यासाठी पाणी आनले जायचे पुरंतू आपल्या जिल्हयात कायम पडत असलेला दुष्काळ पाहता सदर दोन्ही धरणातुन पाणी मिळत नव्हते. 2016 साली अटल अमृत योजने  अंतर्गत उजनी धरणावरून दुप्पट क्षमतेने पाणी आणुण 8 एम एल डी ची पुर्वीची योजना दुप्पट क्षमतेने मंजुर करून 16 एम एल डी प्रमाने पाणी आणणे साठी उजनी योजनचे (upgradation) करून सदर योजना पुर्ण करुन  घेतली.  परंतु अटल अमृत योजना मंजुर करत असताना तत्कालीन सरकार ने शहरासाठी 2021 ची लोकसंख्या गृहीत धरुन एकुण 26 एम एल डी पाण्याचे नियोजन केले होते.  त्यामध्ये उजनी धराणातुन 16 एम एल डी तेरण धरणातुन 5 एम एल डी व रूईभर धरणातुन 5 एम एल डी असे  एकुण 26 एम एल डी पाणी 2021  पर्यंत शहराला  मिळणेसाठी सदर अटल अमृत योजना शहराला मिळाली.  परंतु तेरणा धरण व रूईभर धरणामध्ये दुष्काळामुळे पाणी नसल्याने शहराला पुर्ण क्षमतेने पाणी मिळत नव्हते म्हणजेच शहराच्या 2021  च्या लोकसंख्येप्रमाणे 10 एम एल डी पाणी कमी मिळत होते. व उजनी धरणावरुन जास्तीचे पाणी आनण्यासाठी उजनी धरणावरील पुर्वीचे असलेले 6.5 द.ल.घ.मी. पाणी आरक्षणामुळे मर्यादा येत होती.  हि बाब आमच्या लक्षात आल्या नंतर शिवसेना पक्षप्रमुख  मा.उध्दवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाल्या नंतर औरंगाबाद येथे मराठवाडयाच्या विविध प्रश्नावर आढावा बैठक घेण्यात आली होती त्यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील व तत्कालीन नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी   उध्दवजी ठाकरे  यांना उजनी धरणा वरून आरक्षणात वाढवून देणे याबाबत मागणी केली त्याप्रमाणे लागलीच  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे  यांनी संबंधितांना आदेश देऊन उस्मानाबादकरांची पिण्याच्या पाण्याची अडचण कायम स्वरूपी दूर करण्यासाठी पुढील 30 वर्ष पुरेल एवढे पाणी उजनी धरणातून घेण्यासाठी पाणी आरक्षणात वाढ करण्याच्या सूचना दिल्या. 

 त्यानंतर नगरपरिषदेने 29 डिसेंबर 2020 रोजीच्या सर्वसाधारण सभेमध्ये उजनी धरानातुन वाढीव पाणी आरक्षणाचा ठराव घेतला होता त्यानुसार कृष्णा-खोरे महामंडळ यांच्याकडे रीतसर प्रस्ताव सादर करून त्याअनुषंगाने खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील व तत्कालीन नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी पाठपुरावा केल्याने अखेर उस्मानाबाद शहराला 2052 सालापर्यंत पुरेल एवढे पाणी आरक्षण पूर्वीचे 6.622 द.ल.घ.मी. व  नवीन 15.558 द.ल.घ.मी. एकूण 20.390 द.ल.घ.मी. पाणी आरक्षण मंजूर झाले आहे.  सदर आरक्षणाच्या अनुषंगाने उजनी धरणावरून  अतीरिक्त पाणी आणण्यासाठी धरणावरून समांतर पाणीपुरवठा योजना करण्यासाठी 300 कोटींचा डी पी आर देखील नगर परिषदेने तयार करून ठेवला आहे. सदर आरक्षण मिळाल्याने सदर डी पी आर ला तांत्रिक मान्यता घेऊन अटल अमृत योजना टप्पा-2  किंवा इतर कोणत्याही शासकीय योजनेतून प्रशासकीय मान्यता घेता येईल व तात्काळ काम सुरु करुन 2052 सालापर्यंत उस्मानाबाद शहराला लागणारे पाणी आणण्यासाठी चा मार्ग मोकळा झाला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments