खबरदारी घेण्याचे पोलिसांचे आवाहन
उस्मानाबाद – शहरातील जुना उपळा रोड, शिवसृष्टी नगर भागात रात्री चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला मात्र नागरिकांनी तत्परता दाखवत पोलिसांना फोन केला शेजारच्या नागरिकांना जागे केले त्यामुळे चोरटे तेथून पसार झाले. यापूर्वी देखील याच परिसरात गेल्या महिन्यात चोरीच्या घटना घडल्या होत्या तेव्हा देखील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. नागरिकांनी पुढाकार घेत दरवाज्याना लोखंडी गेट, घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेतले होते. पोलिसांनी देखील गस्त मोठ्या प्रमाणात वाढवली होती. आता देखील ग्रामसुरक्षा दल गस्त घालत असून पोलीस योग्य खबरदारी घेत असल्याची प्रतिक्रिया आनंद नगरचे पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांनी दिली.