लोहारा (यशवंत भुसारे) लोहारा शहरात दरवर्षीप्रमाणे श्रीकृष्ण जन्माष्टमी याही वर्षी शिव मित्र मंडळाच्या वतीने शिवनगर येथे शुक्रवारी १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता दहीहांडी कार्येक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
लोहारा येथील शिवनगर व शिव मिञ मंडळाच्या वतीने गेले १९ वर्षांपासून दही हंडीचा कार्येक्रम उत्साहात साजरा केला जातो. परंतु कोरोना काळात दही हंडी उत्सवास काही निर्बध आले होते.ते यावर्षी सर्व निर्बध हाटविण्यात आले त्यामुळे सर्वत्र बालगोपाळात उत्साहा होता. त्यात शहरातील शिवनगर येथे शिव मित्र मंडळाच्या वतीने दहीहांडी गोविंदाचा चार थराचा मानवी मनोरा उभारुन श्रीकृष्णाच्या वेशभुषात मुले तर राधेच्या वेषभुषा परिधान केलेल्या मुली दहीहंडी कार्येक्रमात सुंदर नृत्य करीत गोविंद ,गोपालांच्या जयघोषात सुरज क्षिरसागर यांनी दही हांडी फोडली. यावेळी नागरीक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.