लोहारा (प्रतिनिधी)
लोहारा तालुक्यातील जेवळी येथील सरपंच तथा लोहारा शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पणुरे यांची शिंदे गट शिवसेना जिल्हाप्रमुख पदी नुकतीच निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. गेली १५ वर्षांपासून मोहन पणुरे हे लोहारा शिवसेना तालुकाप्रमुख म्हणून काम करतात ते कडवट कट्टर शिव सैनिक असुन जेवळी गावचे सरपंच असुन ते राज्य सरपंच परिषदेचे धाराशिव जिल्हाप्रमुख म्हणून प्रामाणिक काम करतात.हिंदूह्रदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते असुन लोहारा उमरगा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांचे अत्यंत विश्वासू खांदे समर्थक आहेत.पणुरे यांची लोहारा तालुक्यावर पकड मजबूत असुन ते राजकारणी खरे दुत आहेत,मोहन पणुरे हे शिंदे गटासामील होताच त्यांच्यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाप्रमुख पदाची मोठी जबाबदारी सोपवल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.