सोलापूर ( अकबर बागवान) – वेळ दु. ४ वाजताची स्थळ : रविवार पेठ जाधव सर्वेअर येथील मारुती सुझुकी शोरूम…. कोरोना विषाणूजन्य आजाराच्या भीतीने संपूर्ण जगात लोक डाऊन करण्यात आले आहे. भारतातही लोक डाऊन करण्याबरोबर संचारबंदी ही लागू करण्यात आली आहे. देशासह महाराष्ट्र राज्यात ही रेल्वे सेवा व एसटी सेवा बंद करण्यात आले आहे. अशावेळी पोटाची खळगी भरण्यासाठी परराज्यातून अनेक कामगार मजूर मुंबई पुणे आदी ठिकाणी गेलेले आहेत मात्र लोक डॉन मुळे व रेल्वे एसटी बंद असल्यामुळे त्यांना आपल्या मूळ गावी जाण्यास अनेक अडचणी येत आहेत. अशावेळी आपल्या मूळ गावी परतण्यासाठी अनेक कामगार मजूर मिळेल त्या वाहनाने तसेच दोन-दोन तीन-तीन दिवस पायी चालत आपल्या गावाकडची वाट पकडताना सोलापूरच्या प्रमुख रस्त्यावर दिसत आहे. ना खायला पुरेसे अन्न प्यायला पाणी अशा खडतर प्रवासात खिशात पैसे नसताना सुद्धा अनेक तरुण अनेक कुटुंबे रस्त्यावरून आपल्या मूळ गावी जाताना दिसत आहे. अशाच काही पाच ते सात तरुण अक्कलकोट रोड पाणी टाकी येथील जाधव सर्वेअर जवळून जाताना दिसले. त्यांना हटकून विचारले असता गेल्या तीन दिवसापासून मुंबईहून सोलापूरचा प्रवास करून आले असल्याचे त्या तरुणांनी सांगितले. कर्नाटकातील यादगिर या गावाहून मुंबई येथे बांधकाम कामगार म्हणून ते सहा ते सात तरुण कामानिमित्त गेले होते मात्र लोक धावून व संचारबंदी मुळे त्यांना आपल्या मूळगावी पडता आले नाही. अशावेळी मिळेल त्या वाहनाने व प्रसंगी अनेक किलोमीटरचा रस्ता पाईप पार खरंच भुकेल्या चेहऱ्याने ते तरुण अक्कलकोट मार्गे कर्नाटकाकडे निघण्यासाठी निघाले असता आमच्या नजरेस पडले. त्यांना कुठे निघाला आहात असा प्रश्न विचारला असता त्यांनी आपली सर्व हकीकत सांगितले. मुंबईहून निघताना अनेक संकटे आलीत अनेक वेळा गाडी वाहने न मिळाल्याने अनेक किलोमीटरचा प्रवास आम्ही पायीच केला रस्त्यावर काही लोकांनी आम्हाला जेवण पाणीसुद्धा दिले असल्याचे त्या तरुणांनी सांगितले. वाहतूक व्यवस्था नसल्याने आम्हाला नाईलाजास्तव फाईज् गावाकडे आमच्या कुटुंबाकडे जाणे भागच असल्याचे त्या तरुणांचे म्हणणे आहे. त्या पाच ते सात तरुणांच्या चेहऱ्याकडे पाहिले असता प्रवास करून त्यांचे चेहरे खूप थकलेले जाणवले तसेच पुरेसा अंना त्यांच्या पोटात नसल्याने त्यांचे चेहरे एकंदरीत भुकेले जाणवले. सुरुवातीस आम्ही त्यांना सविस्तर विचारले असता त्यांनी घाबरून सांगण्यास नकार दिला मात्र आम्ही त्यांच्या तेलुगू या बोलीभाषेत विचारले असता त्यांनी आपली सर्व हकीकत सांगितली. आम्ही त्यांना थोडा वेळ त्या ठिकाणी बसून आमच्या रविवार पेठ भागातील विलास अवसरे , मनोज जोशी, सत्यनारायण वडणाल, अकबर बागवान, राज जाधव यांच्या सहकार्याने किराणा दुकानातून भाकरी शेंगा चटणी दही चपाती व घरातील मिळेल ती भाजी त्यांना देऊन त्यांना आम्ही सहकार्य केले. शिवाय प्रवासात जाताना पाण्याची सोय व्हावी यासाठी तीन ते चार पाण्याच्या बाटल्या सुद्धा त्यांना आम्ही दिल्या. अक्कलकोट आळंद मार्गे त्यांना कर्नाटकात त्यांच्यामुळे गावी जाता येते असे सांगून त्यांना आम्ही अक्कलकोट रोड चा रस्ता दाखवा. विशेष सांगायचे म्हणजे आम्ही त्यांना फार मोठी मदत केली नाही मात्र आम्ही जी काही मदत केली ती मदत त्यांनी आनंदाने स्वीकारून आम्हाला धन्यवाद दिले. या निमित्ताने मी सर्वांना आवाहन करतो की तुमच्या परिसरात तुमच्या भागात सोलापुरात असे जर स्थलांतरित मजूर आपल्या गावाकडे जाताना आपल्या नजरेस आले तर त्यांना शक्य होईल तेवढे आपल्या घरातील जेवण बिस्कीट पुढे पाण्याच्या बाटल्या प्रवासात खाण्यास योग्य असलेले चटणी, भाकर द्यावी. सध्या कोरोना आजारामुळे संपूर्ण भारतात हीच परिस्थिती आहे त्यामुळे आपण या आजाराला न घाबरता शक्य तितकी मदत या स्थलांतरित मजुरांना द्यावी आपण पाहतोच आहोत महाराष्ट्रात किंवा विशेषत सोलापूर जिल्ह्याच्या अनेक भागात अनेक सामाजिक संघटना अनेक तरुण मुले विविध लोकांना अनेक कामगार वर्गातील कुटुंबीयांना धान्य फळे वाटप करत आहेत तसेच परगावाहून आलेल्या अनेक लोकांना अन्नदान करून चांगला उपक्रम राबवत आहेत. त्यामुळे सर्वांनी अशा या गरीब कामगार लोकांना मदत करावे. व ज्यांनी ज्यांनी अशा कामगार लोकांना स्थलांतरित कुटुंबीयांना अन्नदान देऊन मदत केली अशा सर्वांचे या निमित्ताने आभार मानावे.
दोन घास परगावाहून आलेल्या स्थलांतरित तरुणांसाठी
RELATED ARTICLES