तासगाव प्रतिनिधी – कवठेमहांकाळ मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सुमनताई आर. पाटील यांनी एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले आहे. रविवारी त्यांनी एक लाख साठ हजार रुपयांचा धनादेश पालकमंत्री जयंत पाटील यांना दिला.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सामाजीक जबाबदारी म्हणून राष्ट्रवादीच्या खासदार व आमदार यांच्या वतीने केंद्र आणि राज्य सरकारच्या सहाय्यता निधीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री शरदराव पवार यानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदार खासदार यांना आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधी किंवा पंतप्रधान साहित्य निदिना देण्याचे निर्देश दिले होते. आणि तसा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार तासगाव कवठेमंकाळ चे आमदार सुमनताई पाटील यांनी एक महिन्याच्या वेतनाचा धनादेश सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंतराव पाटील यांच्याकडे दिला आहे.