लोहारा (जि. धाराशिव) : लोहारा तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी 2025 ते 2030 या कालावधीसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. या सोडतीत विविध गटांना प्रतिनिधित्व देण्यात आले असून, अनुसूचित जाती, महिला, आणि सर्वसाधारण गटांच्या सहभागाला प्राधान्य देण्यात आले आहे.
यावेळी एकूण 50 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले. यामध्ये अनुसूचित जाती महिलांसाठी 3, अनुसूचित जातींसाठी 4, अनुसूचित जाती महिला व एकूण अनुसूचित जाती मिळून 7 ग्रामपंचायती, तर नवबौद्ध, मागास प्रवर्ग महिलांसाठी (ना.मा.प्र. महिला) 6 ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे सर्वसाधारण महिलांसाठी 13 ग्रामपंचायती आरक्षित असून, उर्वरित ग्रामपंचायती सर्वसाधारण गटासाठी खुल्या ठेवण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या आरक्षणानुसार ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे आहेत :
- अनु.जाती महिला: विलासपुर पांढरी, चिचोंली रेबे, हराळी
- अनु. जाती (सामान्य): दक्षिण जेवळी, जेवळी, फणेपूर, वडगाव वाडी
- ना.मा.प्र. महिला: लोहारा खु., तोरंबा, आष्टा कासार, हिप्परगा रवा, धानरी, कानेगाव
- सर्वसाधारण महिला: उंडरगाव, कोंडजीगड, मोघा बु, नागराळ, बेंडकाळ, भातागळी, कास्ती ख., मार्डी, भोसगा, तावशीगड, बेलवाडी, उदतपूर, एकोंडी लो.
- सर्वसाधारण (पुरुष किंवा महिला): खेड, राजेगाव, अचलेर, दस्तापूर, सास्तूर, होळी, चिंचोली काटे, करजगांव, सालेगाव, आरणी, करवंजी, माकणी
ही आरक्षण सोडत जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्व घटकांना न्याय मिळावा, हा उद्देश लक्षात घेऊन ही प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधींनी व ग्रामस्थांनी या आरक्षणानुसार आगामी निवडणुकीसाठी तयारी सुरू केली असून, काही गावांतून संभाव्य उमेदवारांची चर्चा सुरु झाली आहे.
- तोतया चेअरमनने केली 1 कोटी 10 लाखांची फसवणूक
- महावीर जयंतीच्या सुट्टी दिवशी मोबाईल नोटीसीद्वारे त्रास : लहु खंडागळे यांची जिल्हा पोलिस प्रशासनाविरोधात पोलिस महानिरीक्षांकडे तक्रार
- उमरगा तालुक्यात 2025-2030 सरपंच पद आरक्षण जाहीर – अनुसूचित जाती, जमाती व महिला प्रवर्गाला प्राधान्य
- लोहारा तालुक्यातील 2025-2030 सरपंच आरक्षण जाहीर; अनुसूचित जाती, महिला व सर्वसाधारण गटांना संधी
- कळंब तालुक्यातील 92 ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीची कार्यवाही पूर्ण; अनुसूचित जाती-जमाती, महिला व सर्वसामान्यांसाठी आरक्षण जाहीर