कळंब, ता. १० एप्रिल – आगामी 2025 ते 2030 या कालावधीसाठी कळंब तालुक्यातील एकूण 92 ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडली. तहसील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ही आरक्षण सोडत तहसीलदार हेमंत ढोकले व उपविभागीय अधिकारी संजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
आरक्षण प्रक्रियेनुसार अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 13 ग्रामपंचायती, अनुसूचित जाती महिलांसाठी 8 ग्रामपंचायती, अनुसूचित जमाती व अनुसूचित जमाती महिला मिळून 2 ग्रामपंचायती, तसेच मागासवर्गीय प्रवर्गासाठी (ना.मा.प्र.) 12 ग्रामपंचायती व त्यातील महिलांसाठी 14 ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आल्या आहेत. उर्वरित 43 ग्रामपंचायती सर्वसामान्य व सर्वसामान्य महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
महत्त्वाची ग्रामपंचायती व त्यांचे आरक्षण प्रकार:
- अनुसूचित जाती प्रवर्ग: पिंप्री (शि), डिकसळ, जायफळ, वडगाव (शि), भाटशिरपूरा
- अनुसूचित जाती महिला: शिंगोली, पाथर्डी, देवळाली, बाभळगांव
- अनुसूचित जमाती: नागुलगांव
- अनुसूचित जमाती महिला: घारगांव
- ना.मा.प्र. प्रवर्ग: येरमाळा, शेलगाव दि, भोसा, आडसुळवाडी
- ना.मा.प्र. महिला: नायगांव, मलकापुर, हाळदगांव, शेळका धानोरा
- सर्वसाधारण महिला: रांजणी, पाडोळी, उपळाई, दाभा, गोविंदपूर
- सर्वसाधारण प्रवर्ग: ईटकुर, ढोराळा, आढाळा, बहुला
- धाराशिव जिल्ह्यात महायुतीत समन्वय नाहीच! एकमेकांच्या मंत्र्यांच्या दौऱ्यात पाठ फिरवण्याकडे भर
- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली अतिवृष्टीग्रस्त भागातील पीक नुकसानीची पाहणी
- फास्टॅग वार्षिक पास योजना देशभरात लागू; पहिल्याच दिवशी 1.4 लाख वाहनधारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची कृषिमंत्री दत्तात्रय भरणे करणार पाहणी
- ईटकुर येथील वाशीरा नदीला महापूर मुसळधार पावसात ऊस, सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान,नुकसानीचे पंचनामे करा शेतकऱ्यांची मागणी