मोहा (दिलिप झोरी) :- कळंब तालुक्यातील मोहा येथील लोकसंख्या जवळजवळ दहा हजारांवर असुन लोकसंख्येनुसार गावाचा शेतीशिवार मोठा आहे. तसेच नवीन पिढीतील तरुण सुशिक्षित बेरोजगार यांची संख्याही लक्षणीय आहे. पैकी काही सुशिक्षित बेरोजगार तरुणानी शेतीच्या माध्यमातून बेरोजगारीवर मात करण्याचा प्रयत्न केला.
शेती गहान ठेवून बँकाचे लाखो रुपयाचे कर्ज काढले व
यामध्ये पाँलीहाऊस उभा करून जरबेरा व त्यासारख्या फुलाची शेती केली, तर काहीनी झेंडूच्या फुलाची शेती केली. परंतु दैवाने दिले आणि कर्माने नेहले तर कोरोना व्हारसने खिंडीत गाठले. मौसमात आलेला बहर आसमानी संकटात वाहुन गेला. त्यासाठी नवीन उमेदीने स्वतःहाच्या पायावर उभा राहू पहाणारा तरुण शेतकरी
पार मेथाकुटीला आला असल्याचे दिसुन येत आहे. आशा या शेतकर्यांना झालेल्या नुकसानीबद्दल काहीसा दिलासा मिळावा म्हणून शासनाच्या मदतीची गरज असल्याचे जनतेतून बोलले जात आहे.
मोहा गावातील पदवीधर होऊन नौकरीच्या मागे न लागता आपला पारंपारिक पद्धतीने चालत आलेला शेती व्यवसाय हा नवनवीन प्रयोग करत सुधारीत पध्दतीने करावा म्हणून उच्च विद्याविभूषित व व्यवसायाने डॉक्टर असलेले डॉ. रामचंद्र लकडे यानी
आपली जमीन बँकतारण ठेवून लाखो रुपयाचे कर्ज काढून आपल्या २० गुंठे क्षेत्रात जरबेरा फुलाची लागवड केली. व कमी कालावधीत चांगले उत्पन्न व जास्त पैसा मिळाला परंतु नंतरच्या काळात निसर्गाने केलेली वक्रदृष्टी व पडलेले व व्यापार्याकरवी पाडलेले भाव आणि जागतीक महामारी आलेल्या कोरोना व्हायरस यामुळे ठप्प झालेले बाजार त्यामुळे चांगले आलेले उत्पन्न स्वखर्चाने मजूराकरवी अक्षरशः बांधावर टाकावे लागले आहे. त्यामुळे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. अशीच परिस्थिती शिक्षणाने पदवीधर असलेले श्री संजय भैय्या मडके यांची आहे. नवनवीन प्रयोग करून उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने कर्ज काढून २ एकर जमीनीवर झेंडूच्या फुलाची शेती केली असून उत्पन्न जोमत आले सध्या सणावाराचे दिवस असल्याने भरपूर
पैसा मिळेल असे वाटत असतानाच दुष्काळात तेरावा म्हटल्याप्रमाणे जागतीक महामारीने बाजारावर व वाहतुकीवर परिणाम केला. व बाजार सुनसान तर वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले. शेतात तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेले व कष्टावर जोमात आलेले फुलाचे पिक मजूरी देऊन त्याच्यावर नांगर फिरवला जात आहे. आमदनी चव्वनी खर्च रुपय्या प्रमाणे शेतकरी कोमात गेलेला दिसून येत आहे.
गावोगावची हि परिस्थिती लक्षात घेऊन व संबधीत शेतकर्यांच्या व्यथा जानून शासनाने सहानुभूती पुर्वक विचार करुन आशा शेतकर्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने आर्थिक मदत करावी असे पिडीत शेतकर्यांतुन बोलले जात आहे.
फुलशेतीवर संक्रांत, शेतकरी संकटात. फुले बांधावर, शेतकरी उघड्यावर, कर्जाचा डोंगर डोक्यावर.
RELATED ARTICLES