back to top
Friday, October 11, 2024
Google search engine
Homeताज्या बातम्यापीक स्पर्धेत सहभागी होण्याचे जिल्हयातील शेतकऱ्यांना आवाहन

पीक स्पर्धेत सहभागी होण्याचे जिल्हयातील शेतकऱ्यांना आवाहन

 


 उस्मानाबाद,दि.23(प्रतिनिधी):-राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्याकडून विविध प्रयोग करण्यात येता.उत्पादकतेत वाढ करण्यात येते. प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकते बाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास, त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होऊन अधिक उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल.तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेवून राज्यात कृषी विभागामार्फत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.या पीक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.  

सध्याच्या पीकस्पर्धेतल महत्त्वाच्या बाबी पुढीलप्रमाणे आहेत-

पीकस्पर्धेसाठी पीकनिहाय तालुका हा एक घटक आधारभूत धरण्यात येईल.रब्बी हंगामासाठी स्पर्धेतील समाविष्ट पीके – ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस, तीळ असे एकूण सहा पिके आहेत.प्रती तालुका किमान स्पर्धक संख्या- सर्वसाधारण गटासाठी दहा आणि आदिवासी गटासाठी पाच पीकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीचे शेतावर त्या पीकाखाली किमान 10 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पुरेशे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित पीकाची पीकस्पर्धा संबंधित तालुका कृषी अधिकारी जाहीर करतील.तालुक्यात पीक कापणी प्रयोग घ्यावयाची किमान संख्या – सर्वसाधारण गटासाठी पाच आणि आदिवासी गटासाठी चार स्पर्धेत भाग घेणा-या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. 

      प्रवेश शुल्क-सर्व गटासाठी पीकनिहाय प्रत्येकी रक्कम तीनशे रुपये.अर्ज दाखल करण्याची तारीख – रब्बी ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस, तीळ – 31 डिसेंबर 2021.पीक स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांचे अर्ज विहित नमुन्यामध्ये भरून त्यासोबत ठरवून दिलेले प्रवेश शुल्क चलन,  7/12, 8 अ चा उतारा व जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास)या कागदपत्रांची पूर्तता करून कृषी कार्यालयात द्यावे. 

पीकस्पर्धा विजेत्यांसाठी बक्षीस स्वरुप-

   स्पर्धा पातळी -सर्वसाधारण आणि आदिवासी गट बक्षिस रुपये- 

तालुका पातळी पहिले बक्षिस पाच हजार रुपये, दुसरे बक्षिस-तीन हजार रुपये, तिसरे बक्षिस-दोन हजार रुपये, जिल्हा पातळी पहिले बक्षिस दहा हजार रुपये, दुसरे बक्षिस सात हजार रुपये,तिसरे बक्षिस-पाच हजार रुपये, विभाग पातळी पहिले बक्षिस-25 हजार रुपये, दुसरे बक्षिस-20 हजार रुपये, तिसरे बक्षिस-15 हजार रुपये, राज्य पातळी पहिले बक्षिस-50 हजार रुपये, दुसरे बक्षिस-40 हजार रुपये, तिसरे बक्षिस-30 हजार रुपये असे आहेत.

      पीकस्पर्धेच्या मार्गदर्शक सूचना कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov. in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच अधिक माहितीसाठी आपल्या गावचे कृषी सहाय्यक,कृषी पर्यवेक्षक,तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. 

       रब्बी हंगाम 2021 साठी देखील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रब्बी ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस, तीळ – 31 डिसेंबर 2021 पुर्वी अर्ज सादर करुन पीकस्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  यांनी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना केले आहे.

                                    

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments