उस्मानाबाद
उस्मानाबाद जिल्ह्यात ओमिक्रॉन व्हॅरीयंट रुग्णांची संख्या पाच वर पोहचली असून त्यातील बावी येथील १३ वर्षीय मुलीची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आली आहे. कळंब तालुक्यातील मोहा येथे घाना येथून आलेल्या व्यक्तीचा ओमिक्रॉन व्हॅरीयंट अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तसेच त्या व्यक्तीच्या २ वर्षीय लहान मुलाचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. सध्या दोघांची प्रकृती चांगली आहे.
बावी येथील रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य विभाग आणि प्रशासन सतर्क झाले होते. प्रसार होऊ नये यासाठी प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे.