रिधोरे- (अतुल गवळी)
तांदुळवाडी.ता.माढा येथील श्री. भगवान विश्वनाथ कदम यांच्या शेतात असलेल्या विजेचा पोलवरील कटपॉईंटवर झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे,भगवान विश्वनाथ कदम,प्रकाश श्रीरंग गवळी,पोपट लंकेश्वर,दत्तात्रय निवृत्ती गवळी,दत्तात्रय रघुनाथ खबाले,सिद्धेश्वर श्रीरंग बचुटे यांच्या शेतातील ऊसाला आग लागल्याने जवळपास दहा ते बारा एकर जळून खाक झाला असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.भर दुपारच्यावेळी कडक उन्हात आग लागल्याने आगीने रौद्र रूप धारण केलं होतं.आग विझवण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी कसरत करत व प्रयत्नांची पराकाष्ठा करून जवळपास ८० ते ९०एकर ऊस आगीपासून वाचविण्यामध्ये ग्रामस्थांना यश आले आहे.
ऊस वाचविण्यासाठी अमोल गवळी,मदन गवळी,प्रदीप गवळी,विष्णू अनपट,अतुल गवळी,सोनू परबत,सदानंद गवळी,पांडुरंग गवळी,बाळासाहेब गवळी,महादेव गवळी,प्रकाश कदम,तेजस परबत,बाळासाहेब कदम, निखील भोसले,संकेत गवळी,पिंटू कदम,अजित खबाले, शिवाजी गवळी,समाधान गवळी,लिंगराज शेटे,आदि ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे पुढील अनर्थ टळला.
एकीकडे महावितरण विज बिलाचा तगादा लावत आहे.तर दुसरीकडे विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागून मोठ्या प्रमाणावर झालेल्या पिक नुकसानीची भरपाई त्वरीत द्यावी अशी मागणी संबंधित शेतकऱ्यांनी प्रतिनिधीशी बोलताना केली आहे.