धाराशिव – निवडणुकीच्या काळात कबाब, शबाब, महात्मा गांधी वाटप केले जातील त्याला बळी पडलात तर संविधान गेलं म्हणून समजा असा सावधानतेचा इशारा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी महाएल्गार सभेसाठी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना दिला. तसेच लोकसभेच्या निवडणुकांमध्ये ओबीसींचे १२ -१३ खासदार संसदेत गेले नाहीत तर आरक्षण टिकणार नाही. अशी काळजी त्यांनी यावेळी व्यक्त केली.
छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये झालेल्या या मेळाव्याला प्रचंड मोठा जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की,
जुन्या काळी सत्ता पुजाऱ्याच्या हातून चालत असे आत सत्तेचे केंद्र विधानसभा आहे.सत्तेचे केंद्र आमदार, खासदारांनी घेतलं आहे.आरक्षण आपण वाचविणार, नुसतं वाचवायचं नाही तर आरक्षांतून लोकांचा विकास झाला पाहिजे, उमेदवारी मिळायला पाहिजे, महाराष्ट्राची सत्ता १५९ कुटुंबामध्ये अडकली आहे. अडकलेल्या सत्तेला सोडवायचे आणि सर्व सामान्य लोकांमध्ये फिरवलं पाहिजे.आरक्षणवादी लोकांना उमेदवारी दिली पाहिजे,किमान जो पक्ष १२ ते १५ उमेदवारी देईल तोच आपला पक्ष,दोन महिन्यात लोकसभेच्या निवडणुका आहेत त्यात ओबीसींचे १२ -१३ खासदार गेले नाहीत तर आरक्षण टिकणार नाही.धर्म धोक्यात नाही मात्र धोक्यात असल्याचा कांगावा आरक्षण विरोधकांनी केला
मला कुठल्याही धर्माला विरोध करायचा नाही, समतेचा विचार पुढे घेऊन जायचे आहे असेही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
काठी न घोंगडं घेऊ द्या की मला बी विधानसभेत जाऊ द्या की र – प्रकाश शेंडगे
आरक्षण बचाव महाएल्गार ओबीसी मेळाव्याला संबोधित करताना भाषणाच्या प्रारंभीच माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी काठी न घोंगडं घेऊ द्या की मला बी विधासभेत जाऊ द्या की र या ओळी म्हणून दाखवल्या.
सामाजिक बहिष्काराची भाषा केली, ती बंद करा
घटनात्मक आरक्षण घ्या,ओबीसी दलितांचे राज्य आणा मराठा समाजाची गरिबी हटवू, शिंदे समितीचा जी आर रात्री पावणे तीन वाजता काढला,
सगळं आरक्षण फस्त करण्याचा प्लॅन, तुमचा एकपण दाखला आम्हाला मान्य नाही, तसेच २६ जानेवारी रोजी मुंबईत आझाद मैदान येथे होणाऱ्या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. तसेच जिल्ह्यातील आमदारांवर देखील टीका केली.