धाराशिव – ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असे लेखी आश्वासन राज्य सरकारने दिले होते मात्र सरकारने ओबीसींचा घात केला असल्याचा आरोप माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत केला.
धाराशिव येथे ओबीसींचा महाएल्गार मेळावा आयोजित केला होता तत्पूर्वी पत्रकार परिषद घेत त्यांनी हा आरोप केला आहे.
तसेच मागासवर्ग आयोग हायजॅक केला आहे मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष जरांगे पाटील यांच्या स्टेज वर सर सर म्हणून हाक मारतात मराठा समाज गरीब दाखवण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. सरकारने ५४ लाख कुणबी दाखले असल्याचे सांगितले आहे त्याबाबत देखील स्पष्टता नाही, सर्वेक्षण करताना शासकीय कर्मचारी गरीब नसलेल्यांना गरीब दाखवत आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी भाग पाडू. ओबीसींना त्यांच्या हक्काची जाणीव झाली आहे प्रत्येक गावात ६० टक्के ओबीसी समाज आहे येत्या काळात ओबीसींचा च मुख्यमंत्री होईल. मराठा समाजाला ईडब्लूएस चे १० टक्क्याचे आरक्षण आहे राज्यात साडे आठ टक्का लाभ त्यांनी घेतला आहे. आंदोलन थांबवायचं असेल तर राज्य सरकारने निर्णय घ्यावा असेही ते यावेळी म्हणाले.
पत्रकार परिषदेला टी.पी. मुंडे, यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
ओबीसींचे देखील मुंबईत आंदोलन
मराठा समाजाच्या पाठोपाठ आता ओबीसी देखील मुंबईत आंदोलन करणार असून २६ जानेवारीला आझाद मैदान येथे आंदोलन करणार आहेत.