परंडा (प्रतिनिधी) – सन२०२२-२३या वर्षातील तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार श्रीम.सारिका त्रिंबक (हेगडकर)शिदें यांना राज्याचे आरोग्य मंत्री तथा धाराशिव जिल्हयाचे पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता साळुंखे यांच्या हस्ते दि.२५ जानेवारी रोजी प्रदान करण्यात आला.
गटशिक्षण कार्यालयातील मूळ पदाचा पदभार सांभाळून जि.प.प्रशाला सोनारी येथे इयत्ता नववी,दहावी गणित,विज्ञान विषयाचे अध्यापन तसेच शंभर टक्के निकाल तसेच तेथील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात तृतीय क्रमांक मिळवला जि.प.प्रशाला जवळा येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित विषयाचे अध्यापन व शंभर टक्के निकाल.शाळेवर शिक्षकाचे पद रिक्त असताना आत्तापर्यंत पांढरेवाडी,मुगाव,खानापूर, ब्रम्हगाव इतापेवस्ती,सरणवाडी नं.१अशा अनेक शाळेवर उत्कृष्ट अध्यापन,शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न, विभागस्तरीय,जिल्हास्तरीय प्रशिक्षणामध्ये सहभाग, तालुकास्तरीय,केंद्रस्तरीय प्रशिक्षणामध्ये शिक्षकांना मार्गदर्शन.विज्ञान प्रदर्शन,विज्ञान मिळावे यामध्ये सहकार्य.शाळा भेटी दरम्यान शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन अशा उल्लेखनीय कार्याबद्दल श्रीम.सारिका शिदे (हेगडकर) यांना तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला आहे.
यावेळी जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष धनंजय सावंत,
मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.राहुल गुप्ता,शिक्षणाधिकारी श्रीम.सुधा साळुंखे,गटविकास अधिकारी संतोष नागटिळक, गटशिक्षणाधिकारी अर्जुन जाधव, विस्ताराधिकारी अशोक खुळे, विस्तार अधिकारी सुर्यभान हाके यांच्यासह गटशिक्षण कार्यालयातील सर्व स्टाफ, शिक्षक बंधू,शिक्षक भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.