back to top
Saturday, September 14, 2024
Google search engine
Homeमहाराष्ट्रगांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल

गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल

उस्मानाबाद – लोहारा तालुक्यातील जेवळी (दक्षिण) गावातील गट क्र. 367 मधील शेतात शेत मालक- शिवशंकर चंद्रकांत साखरे, वय 28 वर्षे यांनी गांजा या अंमली वनस्पतीची अवैध लागवड केल्याची विश्वसनीय खबर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोनि- रामेश्वर खनाळ यांना मिळाली होती. यावर ही महिती मा. पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी व उमरगा विभागाचे पोलीस उपअधीक्षक बरकते यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. चे सपोनि- मनोज निलंगेकर, पोहेकॉ- औताडे, अमोल निंबाळकर, धनंजय कवडे, पोना- काकडे यांसह तहसील कार्यालय, लोहारा येथील नायब तहसीलदार- महादेव जाधव व दोन पंच यांच्या उपस्थितीत दि. 29.06.2022 रोजी 19.00 वा. सु. नमूद शेतात पोलीस पथकाने छापा टाकला. यावेळी नमूद शेतातील ऊस पिकात गांजाची 14 झाडे एका ओळीत लावलेली व त्यास पोन, बोंडे असलेली आढळली. ही गांजाची झाडे पथकाने मुळासकट उपटून जप्त केली असता त्यांचे वजन 18.27 कि.ग्रॅ. इतके आढळले. यावरुन शिवशंकर साखरे यांच्याविरुध्द लोहारा पो.ठा. येथे गु.र.क्र. 168 / 2022 हा नार्कोटीक्स ड्रग्ज ॲन्ड सायकोट्रॉपीक सबस्टान्स ॲक्ट कलम- 20 नुसार गुन्हा नोंदवला असून पुढील तपास लोहारा पो.ठा. चे सपोनि-  ररवडे हे करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments