खानापूर(प्रतिनिधी) सोलापूर जिल्हा प्रशासनाने सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवरील तुळजापूर तालुक्यतील धोत्री,खडकी येथून सोलापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर वडजीनजीक भर रस्त्यात मुरूम टाकून रस्ता पूर्णपणे बंद केला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीमा तपासणी नाका उभारणे गरजेचे असताना सोलापूर जिल्हा प्रशासनाने वडजी शिवारात भररस्त्यावर मातीचा भला मोठा १० ते १२ फुट उंचीचा ढिगारा टाकून रस्ता पूर्ण पणे बंद होता.याबाबत खडकी ग्रामस्थांच्या वतीने सुनील नागणे यांनी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी मा.दीपा मुधोळ-मुंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली होती.याची दखल घेत रस्त्यावरील माती बाजूला काढून रस्ता पूर्ववत करण्यात आला.
कोरोना विषाणूचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाबंदी करण्याचे आदेश जिल्हाधिकर्यांनी दिले आहेत.त्यानुसार जिल्ह्याच्या सीमेवर तपासणी नका उभा करून अत्यावश्यक सेवेला वगळून इतर लोकांना प्रेवेश देण्यास मनाईचे आदेश असताना सोलापूर जिल्हा प्रशासनाने जिल्हासीमेवर मातीचा भला मोठा १० ते १२ फुट उंचीचा ढिगारा टाकून पूर्णता बंद केला होता.संचारबंदीच्या आदेशानुसार सर्व जिल्ह्यांच्य सीमा बंद करण्यात आलेल्या आहेत.तुळजापूर तालुक्यातून नांदुरी मार्गे,धोत्री,खडकी वडजीमार्गे सोलापूरकडे जाणारा अंतर्गत रस्ता आहे. याच मार्गावर खडकी वडजी या दोन गावाच्या मध्यावर सोलापूर-उस्मानाबाद जिल्ह्याची हद्द आहे. खडकी गावापासून सोलापूरचे अंतर १२ किलोमीटर आहे.दवाखाना व इतर अत्यवश्यक सेवेसाठी खडकी,धोत्री काटगाव व चव्हाणवाडी येथील नागरिकांना सोलापूर गाठावे लागते.पण हा मार्ग सोलापूर जिल्हा प्रशासनाने जिल्हासीमेवर मातीचा भला मोठा १० ते १२ फुट उंचीचा ढिगारा टाकून पूर्णता बंद केल्याने या चारही गावातील ग्रामस्थांची खूप मोठी गैरसोय होत होती.
या गावातील भाजीपाला,दुध विक्रीसाठी सोलापूर हि मुख्य बाजारपेठ आहे .येथील भाजीपाला दूध सोलापूरच्या बाजारात विक्रीसाठी जातो पण रस्ताच बंद झाल्याने बाजारात भाजीपाला ,दूध घेऊन जायचा कसा असा प्रश्न येथील शेतकऱ्यासमोर पडला होता. दुध,भाजीपाला ह्या अत्यावश्यक सेवेची वाहूतक करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. परतू जिल्हा प्रशासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे येथील शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचे,दुधाचे खूप मोठे नुकसान होत होते.खडकी,धोत्री काटगाव व चव्हाणवाडी या गावातील ग्राम सहयत्ता कक्षातील आरोग्य कर्मचारी,शिक्षक यांना ये-जा करण्यासाठी हाच मार्ग आहे.मात्र रस्ताच बंद केल्याने त्यांचीही गैरसोय होत होती.
याबाबत खडकी ग्रामस्थांनी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी मा.दीपा मुधोळ-मुंडे,तहसीलदार सौदागर तांदळे यांच्याकडे खडकी गाव सोलापूरपासून अवघ्या १२ किलोमिटर अंतरावर आहे.तर तुळजापूरचे अंतर ३५ किमी एवढे असून सोलापुर येथील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा रुग्णालय हेही केवळ १५ किमी अंतरावर आहे.यामुळे गावातील रूग्णासह शेतकर्याना सोलापूर जाणे सोयीस्कर होते परंतु सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर वडजीनजीक रस्त्यावर मातीचा बांध घालून रस्ता बंद केल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत.त्यामुळे याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी खडकी ग्रामस्थांच्या वतीने मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक सुनील नागणे ,शरफोद्दीन मुजावर , शिवाजी जाधव परमेश्वर शिंदे, विध्यादर सोनवणे, अण्णासाहेब साबळे, नागनाथ घाडगे, कैलास जवान , नेताजी जाधव, राजू तळवडे, सचिन कोरे, अंदाप्पा जवान,आनंद कोरे, मल्लिनाथ सोनवणे, विशाल सावंत,बलभीम जाधव, यांनी निवेदनाद्वारे केली होती.याची तात्काळ दखल घेत तुळजपुरचे तहसीलदार सौदागर तांदळे यांनी दक्षिण सोलापुरचे तहसीलदार अमोल कुंभार यांचाशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली.त्यानंतर वडजी येथील मंडळ अधिकारी,तलाठी व पोलीस पाटील यांच्याकडून परस्थितीची माहिती घेऊन त्यांनी अत्यावश्यक सेवेसाठी खडकी,धोत्री,काटगाव यांना ये-जा करण्यसाठी परवानगी देण्याचे आदेश दिले.तसेच अत्यावश्यक सेवेसाठी अडवणूक करण्यात येऊ नये व अडवणूक केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.