उस्मानाबाद :- कोरोना आणि पाणीटंचाईच्या दुहेरी संकटात नांदुर्गा ग्रामपंचायत सापडली असताना प्रशासनाने मात्र हात वर केल्याने गावकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत.
याबाबत माहिती अशी की, नांदुर्गा येथे पाण्याची भीषण टंचाई आहे. याबाबत ग्रामपंचायतीने पंचायत समितीकडे टँकरची मागणी केली तसा रीतसर प्रस्ताव ग्रामपंचायतीने पंचायत समितीकडे दिला. प्रशासनाकडून एक पथक पाहणीसाठी आले मात्र त्यांनी गावापासून ३००० फूट अंतरावर असलेल्या बोअरवेल वरून पाणी आणण्याचा सल्ला दिला मात्र त्यासाठी निधी नाही तुम्ही खर्च करा असे सांगून जनतेला वाऱ्यावर सोडून देण्यात आल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. तसेच गावात १५ मार्च पासुन मुंबई पुणे अश्या ठिकाणाहून अनेक लोक मूळ गावी आल्याने पाण्यासाठी ते गावातील एका टाकी वर गर्दी करत आहेत यामुळे सोशल डिस्टन्सिंग ला खो बसत आहे. कोरोना आणि पाणी टंचाई या दोन्ही संकटात ग्रामस्थ सापडल्याने लोक चिंतेत आहेत. प्रशासनाने याची दाखल घेऊन ही समस्या सोडवण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.
कोरोना आणि पाणीटंचाई दुहेरी संकटात नांदुर्गा
RELATED ARTICLES