उद्या तासगाव व तालुका बंदला तिनही पक्षांचा जाहीर पाठिंबा,व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
तासगाव प्रतिनिधी
शेतकरी विरोधी मोदी सरकार ने केलेल्या काळ्था कायद्याच्या विरोधात भारत देशातला विविध शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक दिली असून उद्या शुक्रवार दिनांक २६ रोजी भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे.सध्या महाराष्ट्र राज्यात महा विकास आघाडीचे म्हणजेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना,शेकाप चे संयुक्त सरकार आहे.त्या अनुषंगाने उद्या भारत बंदला जाहीर पाठिंबा देण्यासाठी तासगाव शहरांमध्ये काँग्रेस भवन येथे आंदोलन करण्यात येणार आहे त्या आंदोलनासाठी तासगाव शहरातील व तालुक्यातील महाविकास आघाडीचे घटक पक्ष असणारे काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष महादेव नाना पाटील उपाध्यक्ष सुनील डी.एम.पाटील, जिल्हा उपाध्यक्ष रवि शेठ साळुंखे यांनी भारत बंद व तासगाव मध्ये काँग्रेस पक्ष सहभागी होणार असून एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करून तासगाव शहर बंदला पाठिंबा असल्याचे सांगितले आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तासगाव तालुका अध्यक्ष विश्वास तात्या पाटील, कार्याध्यक्ष संजय दादा पाटील प्रदेश सरचिटणीस ताजुद्दीन भैया तांबोळी, ज्येष्ठ नेते प्रा भटू पवार सर, शहराध्यक्ष एॅड. गजानन खुजठ,माजी नगराध्यक्ष अमोल नाना शिंदे युवक तालुका अध्यक्ष दत्ता हावळे, युवक शहराध्यक्ष अभिजीत पाटील, स्वप्नील जाधव, कमलेश तांबेकर हे सर्व कार्यकर्ते यांनी भारत बंदला तासगाव शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा असल्याचे सांगितले आहे तर शिवसेनेच्या वतीने भारत बंदला संपूर्ण पाठिंबा असून शिवसेनेचे नेते माजी नगराध्यक्ष अविनाश काका पाटील, सावर्डे चे सरपंच प्रदीप काका पाटील यांनी भारत बंदला आमचा शिवसेना पक्षाचा संपूर्णपणे सहभागी असल्याचे सांगितले आहे . तर शेकापचे नेते अर्जुन थोरात व बाबुराव जाधव, पांडुरंग जाधव, शरद शेळके, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते ज्योतीराम जाधव, दामाजी डुबल, सचिन पाटील यांनी ही भारत मध्ये आम्ही सहभागी असल्याचे सांगितले आहे.उद्या शुक्रवारी तासगाव येथे सकाळी ठीक दहा वाजता काँग्रेस भवन समोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करणार असल्याचे माहिती काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष महादेव नाना पाटील यांनी दैनिक जनमत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली आहे. तर व्यापारी बांधवांना भारत बंद म्हणजे तासगाव ब़द मध्ये सहभागी होऊन पाठिंबा द्यावा असे आवाहन केले आहे.सध्या संपूर्ण भारत देशांमध्ये महागाईने कळस गाठला असून सर्वसामान्य जनतेला जगणे मुश्किल झाले आहे. तरुणांच्या नोकरी गेलेल्या आहेत पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल अशा सर्व वस्तूंचे भाव गगनाला भिडले असून मोदी सरकारचा कारभारामुळे सर्वसामान्य जनतेला जगणे मुश्किल झाले आहे. शेतकरी विरुद्ध सुद्धा त्यांनी काही काळे कायदे केलेले आहेत त्यामुळे या भारत देशातील संपूर्ण शेतकरी बांधव व सर्वसामान्य जनता संतप्त झाली असून उद्या भारत बंदमध्ये सहभागी होऊन आपल्या भावना व्यक्त करतील अशी अपेक्षा सर्व पक्षाचे कार्यकर्ते व्यक्त करत आहे. तरी तासगाव शहराच्या शुक्रवारच्या तासगाव बंदला तासगाव शहरातील व्यापारी बांधव व नागरिकांनी पाठिंबा द्यावा असे आवाहन महाविकास आघाडी च्या वतीने करण्यात आले आहे.