सांगली जिल्ह्यात सध्या लाॅकडाऊन करण्याची गरज नाही -जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांची माहिती

0
49

 

तासगाव प्रतिनिधी (स्पेशल न्यूज)

सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णाची वाढती संख्या पाहता आगामी पंधरा दिवस अत्यंत महत्त्वाची, जोखमीची  आहेत. पण जिल्ह्यात सध्या लाॅकडाऊन करण्याचा कोणताही विचार नसल्याची माहिती सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली आहे पण यासाठी यापूर्वी दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन  करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल सोशल डिस्टन्ससह नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी डाॅ.चौधरी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली आहे फेब्रुवारीपासून ग्रामीण भागात मास्क फिरणाऱ्यावर चाळीस लाख ९० हजार रुपये इतक्या रकमेची  दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.नागरिक यांच्याकडून दंड वसूल करणे हे प्रशासनाचे उद्दिष्ट नाही परंतु नागरिकांनी ही नियमाचे काटक काटेकोर पालन करावे आपल्या आसपासच्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचीची काय स्थिती आहे याकडे पाहावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे जिल्ह्यात कोरोणा रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. जानेवारीपासून आतापर्यंत दोन हजारावर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत प्रशासन कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज आहे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here