नूतन पोलीस निरीक्षक संजिवकुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी कारवाई
तासगाव प्रतिनिधी/(स्पेशल क्राईम न्यूज)
आज रोजी तासगाव पोलीस ठाणे हद्दीत गस्ती दरम्यान गोपनीय बातमीदारा मार्फत एक इसम त्याच्या ताब्यातील चारचाकी गाडीमधून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित गुटखा सुगंधित तंबाखू वाहतूक करीत आहे अशी माहिती प्राप्त झाली त्याप्रमाणे सापळा रचून बस स्टँड परिसरात इसम नाव विशाल हणमंत विभूते वय ३३ वर्षे राहणार विटा यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातील वाहनाची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातील विमल पान मसाला, आर एम डी पान मसाला, एम सेंटेड टोबॅको गोल्ड , व्ही १ सेंटेड टोबॅको असा एकूण २,७१,२०० रु चा माल व वाहन क्रमांक एम.एच. १० सी. आर. ३५७५, वाहन किंमत ३,००००० रु असा एकूण ५.७१,२०० रु चा माल हस्तगत केला
सदर मालाची तपासणी अन्न सुरक्षा अधिकारी,अन्न व औषध प्रशासन विभाग मार्फत करून अन्न सुरक्षा अधिकारी चनवीर राजशेखर स्वामी वय ३१ वर्षे यांचे फिर्यादीवरून भा द वि कलम १८८,२७२,२७३,३२८ व अन्न सुरक्षा कायदा कलम ५९ प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे. सदर घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक दराडे हे करीत आहेत.तासगाव पोलिस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी आपला चार्ज घेऊन आठ दिवस झाले असून तासगाव पोलीस स्टेशनची सूत्रे हातात घेतल्यापासून त्यांच्या सर्व सहकारी अधिकाऱी व कर्मचारी अवैद्य धंदा करणार्यावर कारवाई करण्याची सूचना देण्यात आली होती. त्या सूचनेनुसार सह. पोलीस निरीक्षक पंकज पवार, सहा. पोलीस निरीक्षक दराडे पोलीस उपनिरीक्षक शेळके, उपनिरीक्षक साळुंके, मदने, इतर कर्मचाऱ्यांनी अवैद्य चालणाऱ्या व्यवसायाकडे लक्ष दिले असून लवकरच खुलेआम मटका,रात्रीची वाळूचोरी व जुगार सर्वात महत्त्वाचे गांजा यावर कारवाई करण्याची अपेक्षा तासगावकर नागरिक व्यक्त करीत आहेत.