तुळजापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामधील नगरपरिषदेच्या मालकीच्या जागेवरती अतिक्रमण करुन बांधकाम करणाऱ्या गणपत नरवडे व त्यास सहकार्य करणाऱ्या मुख्याधिकारी, नगरअभियंता, तसेच कर्मचारी यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी यासाठी आरपीआयच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले आहे
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात विविध मागण्या करण्यात आल्या असून प्रामुख्याने तत्कालीन मुख्याधिकारी अरविंद मुढे नगरपरिषद तुळजापूर, नगर अभियंता, बांधकाम परवाना लिपीक, व विकास योजनेचा अभिप्राय देणारे लिपीक यांची तत्कालीन मुख्याधिकारी अशिष लोकरे, व त्यांना सहाय्य करणारे सर्व कर्मचारी यांची या प्रकरणी सखोल चौकशी करून बांधकाम परवानगी देणारे व बांधकामास पुर्णत्वास सहकार्य करणारे तत्कालीन मुख्याधिकारी अरविंद मुंढे व अशिष लोकरे त्यांचे सहकर्मचारी यांच्यावर गुन्हे नोंद त्वरीत 15 दिवसाच्या आत योग्य कार्यवाही करण्यातीत यावी. तसेच दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजने मार्फत होणा-या जमिनचे तात्काळ वाटप करण्या यावे. महात्मा फुले, अण्णा भाऊ साठे ,मोलाना आझाद, संत रोहीदास महाराज या सर्व महामंडळाला तात्काळ निधी उपलब्ध करुन प्रकरणाचे वाटप करण्यात यावी. संजय गांधी श्रावण बाळ निराधार योजनेतील प्रकरणे तात्काळ मंजूर करून लाभार्थ्यांना तात्काळ पगारी चालू करण्यात याव्या, रमाई आवास योजनेची प्रकरणे तात्काळ मंजूर करण्यात यावी., महागाई निर्देशांकाप्रमाणे मागास्वर्गीय विदयार्थ्याच्या शिष्यवर्ती मध्ये वाढ करण्यात यावे या मागण्या करण्यात आल्या आहेत. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ, रंजित गायकवाड,तानाजी कदम,आनंद पांडागळे, विद्यानंद बनसोडे,संपत जानराव,प्रविण बनसोडे,उद्य बनसोडे,स्वराज जानराव आदींची स्वाक्षरी आहे.