उस्मानाबाद ,दि.14(प्रतिनिधी): स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि शरद यशवंत दिव्यांग अस्मिता अभियाना निमित्त दि.15 ते 31 डिसेंबर 2021 दरम्यान दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र देण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. या विशेष मोहिमेची औचित्य साधून जास्तीत जास्त दिव्यांगानी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.याला प्रतिसाद म्हणून उस्मानाबाद येथील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय पाटील यांनी दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र देण्यासाठी जिल्हांतर्गत विशेष मोहिमेचे आयेाजन करण्यात आलेले आहे.यानुसार उस्मानाबाद जिल्हा रुग्णालय आणि तुळजापूर उप जिल्हा रुग्णालय यांनी उमरगा येथे चालू महिन्यात दि.15,17,22,24,29 आणि उप जिल्हा रुग्णालय कळंब दि.17,24, व 31 तसेच ग्रामीण रुग्णालय भूम येथे दि.15,22, आणि 29 डिसेंबर 2021 रोजी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून निश्चित केलेल्या तारखानुसार शिबिराचे आयोजन केले आहे. करिता त्या त्या तालुक्यातील आणि जवळच्या परीसरातील दिव्यांग लाभार्थ्यांनी शिबिराचा लाभ घ्यावा,असे आवाहन डॉ.पाटील यांनी केले आहे.
दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र देण्यासाठी जिल्हा रुग्णांलयाची विशेष मोहिम
RELATED ARTICLES