उस्मानाबाद – जिल्ह्यातील चालू असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करण्याची मागणी अठरापगड जातीच्या मावळ्यांची छावा संघटनेच्यावतीने आज दिनांक २१ जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे
दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की उस्मानाबाद जिल्ह्यासह शहरांमध्ये मोठ्याप्रमाणात गुटखा अवैध सावकारी दारू जुगार अवैध रीतीने मोठ्या प्रमाणात चालू असून या धंद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत आहे
तरी उस्मानाबाद जिल्ह्यातील चालू असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावे अशी मागणी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे
या निवेदनावर जिल्हाध्यक्ष राकेश पवार कार्याध्यक्ष अमोल सिरसट, सल्लागार ॲड.आकाश मगर ॲड. योगेश पडवळ,वामन खताळ,योगेश ताटे, संतोष जगदाळे यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत