उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी राष्ट्रीय आयुर्वेदिक आयोग समिती येणार आहे. नवीन शासकीय रुग्णालय येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार असल्याने त्याअनुषंगाने ही पाहणी असणार आहे.
दरम्यान गेले अनेक दिवस जिल्हा शासकीय रुग्णालयात अस्वच्छता निर्माण होती. कोरोना सारख्या काळात ज्या रुग्णालयात कित्येक रुग्णांचे उपचार केले आहे त्या इमारतीकडे जिल्हा आरोग्य प्रशासनाने स्वच्छतेबाबत लक्ष दिले नव्हते. रुग्णालयात ठीकठिकाणी गुटखा खाऊन थूंकलेल्या भिंती अस्वच्छता पहावयास मिळत होती. याबाबत दैनिक जनमत ने वृत्त प्रसारित केले होते याची दखल प्रशासनाने घेतली.
जिल्हा रुग्णालयातील नवीन इमारतीत मागील दोन ते तीन दिवसांपासून नगरपालिकेच्या वतीने सफा सफाई चे काम चालू केली असून तपासणीत कुठलीही त्रुटी राहू नये याची काळजी घेत असल्याची प्रतिक्रिया नगर परिषदेचे मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे यांनी दिली.