उस्मानाबाद,20(प्रतिनिधी):- विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाकडून महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिव पुरस्काराकरिता इच्छुक व्यक्ती आणि संस्था यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
विरशैव-लिंगायत सामाजिक, शैक्षणिक अर्थिकदृष्टया विकास होण्यासाठी सामाजिक, शैक्षणिक, कलात्मक, सांस्कृतिक, समाज प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात कार्य करणा-या कलावंत साहित्यिक,समाज प्रबोधन तसेच साहित्यिक क्षेत्रात कार्य करणा-या कलावंत साहित्यिक,समाज प्रबोधनकार, समाज सेवक व्यक्ती आणि संस्था यांच्या कार्याचा उचित सन्मान व्हावा तसेच त्यांच्या कार्याची प्रेरणा वृध्दीगत व्हावी म्हणून राज्य सरकारने या पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे.
इच्छुक व्यक्ती आणि संस्था यांनी पुरस्कारासाठी त्यांच्या विहीत नमुन्यातील अर्ज सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे दि. ०४ फेब्रुवारी-२०२२ पर्यंत सर्व कागद पत्रासह सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बी.जी. अरवत यांनी केले आहे.
विहीत नमुन्यातील अर्ज व पुरस्काराविषयी सविस्तर माहिती या कार्यालयाकडे तसेच महाराष्ट्र शासनाच्याwww.maharashtra.gov .in वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला आहे. त्याचा संगणक सांकेतांक क्रंमाक २०१९०३०८२०३९००३५२२ असा आहे.