भूम ( वसीम काजळेकर)- येथील नगरपरिषदेचे गटनेते तथा विकासाचे मॉडेल म्हणून भूम चा विकास करनारे संजय गाढवे यांचा वाढदिवस शहरात अतिशय उल्हासात उत्साहात साजरा करण्यात आला . वाढदिवसाच्या निमित्ताने शहरातील गरजू रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासू नये म्हनून रक्तदान शिबिर, शालेय साहित्याचे वाटप असे विविध उपक्रम घेत कार्यकर्त्यांनी वाढदिवस साजरा केला . यावेळी घेण्यात आलेल्या रक्त दान शिबिरात ११५ बहादरांनी रक्तदान केले.
यावेळी मा. नागराध्यक्ष संजय गाढवे यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या शहरातील कसबा येथील सार्थक या निवासस्थानी सकाळी पासून रात्री उशिरापर्यंत विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकारणी, तसेच कार्यकर्ते, सर्व नगरसेवक आनी आलमप्रभू शहर विकास आघाडीचे पदाधिकारी यांची होती गर्दी झाली होती. तसेच यावेळी संजय गाढवे प्रतिष्ठान च्या वतीने वाढदिवसाच्या निमित्ताने क्रेन च्या साहाय्याने भलमोठा हार घालत आनी रिमोट द्वारे उडणारी शोभेची दारू उडऊन अभिष्टचिंतन करण्यात आले.
या वेळी नियोजन समिती सदस्या तथा उपनगराध्यक्षा संयोगिता गाढवे , युवा नेते साहिल गाढवे ,आलमप्रभू भूम शहर विकास आघाडीचे अध्यक्ष संजय साबळे , सचिव तथा सूरज गाढवे, युवा नेते खंडेराव गोयकर, यशस्वी उद्योजक बाळासाहेब सुर्वे, आदर्श शिक्षक अमोल गायकवाड , एस . जी . फॅन्स क्लबचे बालाजी अंधारे,संत सावता परिषदेचे सुनील माळी , पाकिजा ग्रुपचे मुशीर शेख , राकेश जाधव, शाहरुख सय्यद यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.