धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की आणि त्यातून होणाऱ्या तक्रारी मुळे भितीचे वातावरण निर्माण झालेले असताना मेसाई जवळगा येथील सरपंचावर हल्ला झाला हा हल्ला पवनचक्की प्रकरणात झाल्याचा प्राथमिक संशय निर्माण करण्यात आला होता मात्र याबाबत हा हल्ला बंदुक परवाना मिळवण्यासाठी सरपंचाने स्वतःच्या गाडीवर हल्ला करण्याचा बनाव केल्याचे तपासातून समोर आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,
फिर्यादी . नामदेव बालीश निकम, वय 38 वर्षे, व्यवसाय गाडी धंदा टुर्स ऍन्ड ट्रॅव्हल्स पुणे ह.मु. जवळगा मेसाई यांनी दिनांक 27 डिसेंबर रोजी फिर्यादी जबाब दिली की, फिर्यादी व त्यांचा मित्र प्रविण नरहरी इंगळे हे दोघे दि.26.डिसेंबर रोजी रात्री 10 वाजणेचे सुमारास व्होनाळा ते जवळगा मेसाई रोडने त्यांची कार क्र. MH 12 QT 7790 मध्ये जात असताना दोन नेमप्लेट झाकलेल्या मोटारसायकल वरील तोंड झाकलेल्या चार अज्ञात व्यक्तीने मिळून फिर्यादी यांचे गाडीवर दोन्ही बाजूने अंडे, दगड, सिमेंटचा ठोकळा असलेल्या पाईपने मारुन काच फोडली. त्यानंतर गाडीत असणारे फिर्यादी व साक्षीदार प्रविण इंगळे यांचे अंगावरती पेट्रोल भरलेला फुगा फेकुन हल्ला केला आहे. अशा प्रकारची माहिती पोलीसांना कळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी रवाना होवून घटनासथ्ळाची पाहणी केली. नामदेव बालीश निकम यांचे फिर्याद जबाब वरुन अज्ञात चार लोकाविरुध्द पोस्टे तुळजापूर गु.रं.नं. 591/2024 कलम 110,324 (6), 118(1), 126(2),352, 3(5) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करुन सदर गुन्ह्याचा तपास सुरु केला.
सदर गुन्ह्याचे तपासामध्ये घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण केले असता घटनास्थळावरील परिस्थिती आणि फिर्यादी यांनी सागिंतलेली घटना यामध्ये विसंगती दिसुन येत होती. सदर गुन्ह्याचा तांत्रीक पध्दतीने तपास करुन यातील फिर्यादी नामदेव निकम व साक्षीदार प्रविण इंगळे या दोघांना विश्वासात घेवून अधिक तपास केला असता फिर्यादी व साक्षीदार यांनी सदरची घटना ही फिर्यादी यांना बंदुकीचे लायसन्स काढणेसाठी स्वतःवर इतर अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्याचा बनाव केल्याचे निष्पन्न झाले आहे.
तरी सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांनी स्वतःला बंदुकीचे लायसन्स मिळविणे करीता स्वतःव साक्षीदार यांचेवर पेट्रोल टाकुन, गाडीचे काच फोडून हल्ला केल्याचे कृत्य हे फिर्यादीने स्वतःच करुन हल्ला केल्याचा बनाव केलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास मा. पोलीस अधीक्षक संजय जाधव सो यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस
अधीक्षक गौहर हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ निलेश देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे व स्थानिक गुन्हे शाखेची टिम, पोलीस निरीक्षक रविंद्र खांडेकर, सपोनि भालेराव, सपोनि चासकर यांनी केलेला आहे.